चाकण: नगर परिषद हद्दीतील रोहकल रस्त्याचे थोड्या अंतराचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. परंतु अर्धापेक्षा अधिक रस्ता कच्चा असल्याने यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यातून वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण झाले आहे. त्यातच पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाला असून या चिखलातच बाजार समिती समोर ट्रक रुतल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
चाकण-रोहकल रस्त्यावर काही भागात पालिकेच्या माध्यंमातून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. अजूनही काही रस्ता कच्चा असल्याने सध्याच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा शनिवारचा जनावरांचा बाजार भरत असतो. रोहकल गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर दुचाकी,चारचाकी वाहनांनासह पादचाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. या रस्त्यावर चिखल साचला असल्याने यामध्ये एक ट्रक अडकला होता.
चाकण नगर परिषद हद्दीतील रोहकल रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने यावर निधी खर्च करण्यास प्रशासकीय अडचणी येतात. यासाठी हा रस्ता पालिकेकडे वर्ग करण्यासाठी बांधकाम विभागास पत्र दिले आहे. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने रस्ता दुरुस्तीला खीळ बसली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागही या रस्त्याचे काम करत नाही, असे रोनक गोरे यांनी सांगितले.
चाकणच्या रोहकल रस्त्यावरील देशमुख वस्ती (करनडव्हरा) येथे पर्यंत पालिकेची हद्द आहे.या रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जनावरांचा बाजार भरत असतो.तसेच मोठ्या प्रमाणात रहदारी ही वाढल्याने विविध विकास कामे करण्यात येत आहेत.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याने कामे करणे अवघड होते आहे.
नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी, चाकण नगर परिषद.
०९ चाकण रस्ता
रोहकल रस्त्यावर बाजार समिती समोर चिखलात ट्रक रुतला.
090921\20210909_121601.jpg
???? - ????? ????????? ????? ????? ???? ?????? ???? ????? ???.