शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

खड्डे घेऊन... नेमेची येतो पावसाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:10 AM

पालिकेकडून तीन वर्षांत अडीच कोटी खर्च : दरवर्षी वाढत आहे खड्ड्यांसाठीची तरतूद पुणे : पावसाळा आणि रस्त्यांवरील खड्डे हे ...

पालिकेकडून तीन वर्षांत अडीच कोटी खर्च : दरवर्षी वाढत आहे खड्ड्यांसाठीची तरतूद

पुणे : पावसाळा आणि रस्त्यांवरील खड्डे हे समीकरणच झाले आहे. त्यातच शहरात सातत्याने होणारी खोदाई आणि मेट्रोचे लांबत चाललेले काम यामुळे रस्त्यांवर खड्डे आणि चढउतार पाहायला मिळत आहेत. शहरातील बहुतांश रस्त्यांना जागोजाग ‘ठिगळे’ लावलेली आहेत. अशास्त्रीय पद्धतीने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांच्यामागे पाठीचे दुखणे मागे लागत आहे. तसेच रस्ते करताना शास्त्रीय पद्धतीने उतार न देण्यात आल्याने जागोजाग पाण्याची तळी साचत आहेत. गेल्या तीन वर्षांत शहरातील खड्ड्यांवर तब्बल अडीच कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

पालिकेचा पथ विभाग आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डे दुरुस्ती केली जाते. पावसाळ्यात डांबरी रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण असते. डांबरी रस्त्यांना शास्त्रीय पद्धतीने उतार न दिल्याने पाणी मुरुल्याने डांबर उखडून बाहेर येते. त्यामुळे खड्डे पडतात. रस्त्यांची कामे करताना आधीचा रस्ता पूर्णपणे उकरुन त्याजागी नव्याने डांबर आणि खडी टाकून रस्ते करणे आवश्यक असते. मात्र, पालिकेने ठेकेदार डांबरी रस्त्यावरच रस्ता चढवतात. त्यामुळेही खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या कामांवर लक्ष ठेवण्याची आणि दर्जा राखण्याची जबाबदारी असलेले अभियंते ‘टक्केवारी’चे गणित जुळविताना याकडे दुर्लक्ष करतात.

लॉकडाऊनचा फायदा घेत पालिकेने शहरातील मध्यवस्तीमधील रस्ते खोदून तेथील मलनि:स्सारण आणि जलवाहिन्या बदलण्याचे काम केले. मात्र, हे काम झाल्यावर रस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ववत करण्यात आले नाही. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्त्याची सध्याची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

यासोबतच वारजे, कात्रज, न-हे, धायरी, आंबेगाव, कोंढवा, महंमदवाडी, हडपसर, मुंढवा, बिबवेवाडीसह अनेक भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्यांवर पाणी साचून राहात असल्याने पाण्याखालील खड्डेही दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचे किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत आहेत. पुण्यात यापूर्वी खड्डे चुकविताना झालेल्या अपघातात वाहनचालकांना प्राणही गमवावे लागलेले आहेत.

===

खड्ड्यांवर झालेला अंदाजे खर्च

वर्ष खर्च

2018-19 50 लाख

2019-20 80 लाख

2020-21 1 कोटी

====

रस्त्यांवरुन जाताना सतत खड्डे चुकवावे लागतात. पाठीच्या दुखण्याचा त्रास असलेल्या नागरिकांना तर वाहन चालविणेच नको वाटते आहे. कोणताही रस्ता समतल पातळीवर नाही. पावलोपावली वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविताना अपघात होऊन गंंभीर इजा व्हायची भीती वाटते.

- आशुतोष चावरे, सहकारनगर, पुणे

====

कुटुंबाला गाडीवर घेऊन जाताना तर भीतीच वाटते. रस्त्यात कधी खड्डा येईल आणि ब्रेक दाबावा लागेल याचा नेम नाही. समोरची गाडीची अचानक थांबते. त्यामुळे धडक बसण्याची भीती असते. खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत असून शारीरिक व्याधीही निर्माण होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने खड्ड्यांची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहेच. मात्र, हे खड्डे पडूच नयेत याकरिता रस्त्यांची बांधणी शास्त्रीय पद्धतीने होणे आवश्यक आहे.

- अ‍ॅड. दिलीप जगताप, कात्रज, पुणे

====

खड्ड्यांमुळे होऊ शकतो मणक्याचा त्रास

दुचाकी अथवा चारचाकी वाहन खड्ड्यात जोरात आपटल्याने पाठीचे किंवा मणक्याचे आजार उद्भवू शकतात. अनेकदा हेअर क्रॅकही होतात जे सहसा पटकन लक्षात येत नाहीत. यासोबतच अपघातानंतर कायमचे अपंगत्वही येण्याची शक्यता असते. यासोबतच स्पॉंडिलायसिसही होऊ शकतो. वाहन चालकांनी दक्षता घेऊनच गाडी चालविली पाहिजे.

- डॉ. महानंद लोखंडे