शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

प्राधान्यक्रमासह हवा विकास आराखडा

By admin | Published: December 23, 2016 12:27 AM

सर्वांगीण विकास साधत लोणावळा शहराला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्यासाठी शहरातील अनेक पायाभूत सुविधा व पर्यटन

लोणावळा : सर्वांगीण विकास साधत लोणावळा शहराला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्यासाठी शहरातील अनेक पायाभूत सुविधा व पर्यटन विकासाच्या धूळ खात पडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची गरज आहे. हे महत्त्वाचे प्रकल्प विकास आराखडा तयार करीत क्रमवारीने पूर्ण केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो.हे सर्वच प्रकल्प जादूची कांडी फिरविल्यासारखे एका दिवसात पूर्ण होणार नाहीत. मात्र, त्यामध्ये विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविल्यास कोणती कामे पहिल्या टप्प्यात करायची, कोणती दुसऱ्या टप्प्यात करायची याचे योग्य नियोजन झाल्यास ते मार्गी लागू शकतील. मूलभूत व पायाभूत समस्या सोडविण्याबरोबरच काही पर्यटन विकासाचे महत्त्वाचे प्रकल्पदेखील पंचवार्षिक काळात पूर्ण करता येऊ शकतात. याकरिता पाच वर्षांत कोणती कामे प्राधान्यक्रमाने करायची याचा विकास आराखडा लोणावळा नगर परिषदेने तयार करण्याची गरज आहे.शहरात वाहतूककोंडी व कचरा या दोन्ही समस्या जटिल आहेत. त्या दोन्ही कामांना प्राधन्य देण्याची गरज असून, वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरण, वाहनतळ, अतिक्रमण हटविणे, पर्यायी रस्ते खुले करणे यासोबत भांगरवाडी येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी शहरातील कचराकुंड्यांमधील, तसेच घरोघरचा कचरा गोळा करून तो वरसोली येथील कचरा डेपोवर टाकण्याचे महत्त्वाचे काम विनाअडचण करणे गरजेचे आहे. इंद्रायणी नदी उगमस्थानाचे सुशोभीकरण करून पात्राची सुधारणा आवश्यक आहे. उद्यानांची दुरुस्ती करून त्यामध्ये लेजर शो, सायन्स पार्कची उभारणी करणे, भुयारी गटर योजना नव्याने राबवत बंद असलेले मलशुद्धीकरण केंद्र सुरू करणे, भाजी मार्केटची इमारत स्वबळावर उभी करत खाली दोन मजली पार्किंग उभारणे, नगर परिषद मिळकतींचा रखडलेला लीजचा प्रश्न, क्रीडास्कूल, कुणेनामा येथील रोप वेलगतच्या जागेवर बग्गी जम्पिंग साहसी खेळ प्रकार सुरू करणे, खंडाळा तलाव सुशोभीकरण व नौकाविहाराचे वर्षभरापासून अर्धवट राहिलेले काम पुन्हा सुरु करून ते पर्यटकांसाठी खुले करणे, २४ तास मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या प्रकल्प कामास सुरुवात करून सध्या बंद असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करणे, वलवणमधील तलावाचे सुशोभीकरण करून नौकाविहार केंद्र सुरू करणे, तुंगार्ली धरणाचे मजबुतीकरण व सुशोभीकरण करणे, पर्यटन सहायता कक्ष उभारणे याचा प्राधान्यक्रम ठरवून तसा विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)