पुणे : रहदारीच्या वेळेत रस्त्यावर थांबणाऱ्या स्कूल बसमुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होतो. यातून मार्ग काढण्यासाठी स्कूलबसच्या तात्पुरत्या पार्किंगबाबत आराखडा करण्याचा निर्णय जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुक करण्यासाठी उच्च न्यायालयाने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्र्षांतील कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा स्कूल बस समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, आनंद पाटील, अनिल वळीव, वरीष्ठ वाहतूक विभागातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय बाजारे, शिक्षण विभागातील अधिकारी गौतम शेवाडे, माणिक देवकर या वेळी उपस्थित होते. शालेय वाहतुक करणाऱ्या बसला ठराविक वेळेपुरती तात्पुरती पार्किंगची व्यवस्था निर्माण करणे, त्यासाठी पोलीस विभाग, शालेय व्यवस्थापन आणि महापालिकेने आराखडा तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थी वाहतुकीवर मुख्याध्यापक, चालक आणि सहाय्यकांची कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. आपला मुलगा-मुलगी कोणत्या स्कूल बसमधून अथवा वाहनातून शाळेत जातात. त्याची आसनक्षमता काय आहे, चालक कसा आहे याची सर्व माहिती पालकांनी घ्यावी. विद्यार्थी वाहतुकीसाठी खासगी बसचा वापर करु नये असे आवाहन उपप्रादशिक परिवहन अधिकारी राऊत यांनी केले. विद्यार्थी वाहतुकीबाबत पालकांमध्ये जागृती व्हावी या साठी जागो पालक जागो हे ब्रीदवाक्य घेऊन अभियान राबविण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
स्कूल बस पार्किंगचा होणार आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:00 PM
शालेय वाहतुक करणाºया बसला ठराविक वेळेपुरती तात्पुरती पार्किंगची व्यवस्था निर्माण करणे, त्यासाठी पोलीस विभाग, शालेय व्यवस्थापन आणि महापालिकेने आराखडा तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्देस्कूल बस समिती : शाळा प्रशासन, पोलीस, महापालिकेवर जबाबदारीशालेय विद्यार्थी वाहतुकीवर मुख्याध्यापक, चालक आणि सहाय्यकांची कार्यशाळा