पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक विमानतळं सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. या वादळाचा फटका पुणेविमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांनादेखील बसला. पुण्यातून दक्षिणेकडे चेन्नई, हैदराबाद, विशाखापट्टणम येथे जाणारी येणारी एकूण १२ उड्डाणे सोमवारी रद्द केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
पुण्यातून दक्षिणेकडे जाणारी सहा आणि पुण्यात येणारी सहा विमान उड्डाणे रद्द केली होती. परिणामी, विमान प्रवाशांचे सोमवारी प्रचंड हाल झाले असून, यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे विमानतळावरून दररोज १८० ते १९० च्या घरात विमानांची रोज उड्डाणे होत असतात. त्याद्वारे ३० हजार प्रवासी दररोज विमानाने प्रवास करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खराब हवामानाचा विमानसेवेवर फटका बसत आहे. परिणामी उड्डाणे रद्द केली आहे, याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यात मुख्यत्वे करून दिल्लीतील धुके, प्रदूषणामुळे पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानांच्या वेळांमध्ये सातत्याने बदल होत असून, प्रवाशांना तासनतास विमानतळावर बसावे लागत आहे.
आता चेन्नईत आलेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे पुण्यातून चेन्नईसह दक्षिण भागात इतर ठिकाणी जाणारी आणि तेथून पुण्यात येणारी १२ विमान उड्डाणे रद्द केली आहेत.
पुण्यातून रद्द झालेली विमान उड्डाणे
विमान उड्डाणे - संख्या
पुणे - मंगळूर - 01पुणे - हैदराबाद - 01पुणे - चेन्नई - 02पुणे - बंगळूर - 01पुणे - नागपूर - 01
पुण्यात येणारी रद्द झालेली उड्डाणे...
विमान उड्डाणे - संख्या
चेन्नई - पुणे - 03मंगळूर - पुणे - 01हैदराबाद - पुणे - 01नागपूर - पुणे - 01