भोर - जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आराखडे तयार करून या महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्षा मौसमी बर्डे यांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या प्रत्येक गावात शिवारफेरी काढून टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये, ते पाणी जमिनीत मुरावे आणि टंचाई दूर व्हावी, म्हणून शासनाने टंचाईग्रस्त गावे, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी गावे, एकात्मिक पाणलोटक्षेत्र विकास योजनेत असणारी गावे, तसेच आमदार-खासदार यांनी आदर्श गाव म्हणून निवडलेल्या गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला आहे. या गावांसाठी नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे.लवकरच आराखडे तयार करून विविध विभागांना पाठवून त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षी १९ मार्चपर्यंत जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण करायची आहेत. जलयुक्त शिवार योजनेत २०१५/१६ साठी १२ गावे, २०१६/१७ मध्ये १२ गावे आणि या वर्षी २०१८/१९ मध्ये २० गावांची निवड करण्यात आली आहेत. योजनेच्या माध्यमातून विविध कामे करून गावातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.जलयुक्त शिवार अभियानातधावडी, कारी, धामुणशी, आपटी, म्हसर बुद्रुक, करुंगण, माजगाव, लव्हेरी, डेरे, भांड्रावली, कोंडगाव, कुरुंजी, खोपी, देगाव, कुसगाव, टापरेवाडी, चिखलगाव, कोंढरी, आंबाडे, कामथडी, जांभळी, तळजाईनगर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.कामे २0१९ पर्र्यत पूर्ण करणारसन २०१८/१९ या वर्षासाठी २० गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. मागील वर्षी १२ गावे घेण्यात आली होती. या गावांत कृषिवन, छोटे पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागांतर्गत गाळ काढणे, नालाखोलीकरण, सरळीकरण दुरुस्ती, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे, वळण बंधारे, सलग समतल चर, शिवकालीन टाक्या ही कामे लोकसहभागातून व सामाजिक संस्था किंवा कंपन्यांकडून कामे करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पाहणी करून याच महिन्यात अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असून त्याला लगेच मंजुरी मिळणार आहे. ती कामे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करायची असल्याचे कृषी अधिकारी व जलयुक्त अभियानाचे सचिव सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.
जलयुक्तच्या नवीन गावांचे आराखडे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 2:27 AM