रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे व कार्याध्यक्ष नीलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात वृक्षारोपण मोहीम सुरू आहेत.
या वृक्षारोपण शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष पुष्कराज जाधव, पंचायत समिती सभापती नलिनी लोळे, पानवडीचे माजी सरपंच हरिभाऊ लोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी प्रतिष्ठानचे मुख्य राज्य प्रवक्ते प्रमोद कारकर, पुणे जिल्हा समन्वयक हरिदास भिसे, महिला समन्वयक तृप्ती शिंदे, तालुका संघटक भरत खेनट, तालुका समन्वयक शीतल पवार, प्रसाद परखंडे, सचिन पोमण, गौरव खेडेकर, शुभम परखंडे, सायली कामथे, प्रांजल झेंडे, पिंपळे सरपंच मीनाक्षी पोमण, उपसरपंच किरण खेनट, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला पोमण, गौरी गोफणे, विद्या खेनट, सारिका दाते, अमोल पोमण, शरद शिवरकर, ग्रामसेवक शरद बिनवडे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय पिंपळेचे मुख्याध्यापक शिवाजी घोगरे, शिक्षक रमेश जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठान व ग्रामपंचायतीच्या वतीने ऑक्सिजन देणाऱ्या १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यात प्रामुख्याने वड, पिंपळ, कडूनिंब, आवळा, चिंच, जांभूळ इ. झाडे लावण्यात आली.
पिंपळे येथे वृक्षारोपण करताना प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे समवेत विराज काकडे पुष्कराज जाधव, प्रमोद कारकर मीनाक्षी पोमण, युवराज खेनट व इतर.