भिगवण सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष संपत बनगर, तसेच विद्यमान अध्यक्ष रणजित भोंगळे यांच्या संकल्पनेतून तीन हजारांपेक्षा जास्त झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भिगवण क्लबचे सदस्य औदुंबर हुलगे यांनी सलग 101 दिवस खंड न पाडता दररोज पन्नास किलोमीटर आंतर चालवण्याचा संकल्प पूर्ण केल्यामुळे त्यांचाही खास सत्कार डाळज ग्रामस्थांकडून करण्यात आला.
यावेळी भिगवण सायकल क्लबचे अध्यक्ष रणजित भोंगळे, संपत बंडगर, डॉ. अमोल खानावरे, औदुंबर हुलगे, रणजीत जगदाळे, अर्जुन तोडेकर, प्रदीप ताटे, तुकाराम जगताप, महेश जगताप, कुमार परकाळे, आप्पा हगारे, रमेश कुचेकर, किशोर भोसले, अक्षय झनझणे आदी उपस्थित होते