या वेळी सुदीक्षाजी महाराज म्हणाले की, पुणे जिल्ह्यामध्ये ४००० इतक्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी १००० वृक्षांची लागवड खुटबाव येथे करण्यात आली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले की, संत निरंकारी मिशनद्वारे खुटबाव येथे वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. खुटबाव ग्रामस्थांच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न राहील. गावातील राजेश शितोळे यांनी झाडांसाठी ठिबकची सोय करण्यात येईल. संपूर्ण भारतातील २२ राज्यांच्या २८० शहरांमध्ये निवडक ३५० ठिकाणी या योजनेअंतर्गत सुमारे १ लाख ५०,००० रोपांची लागवड करण्यात आली. या झाडांमध्ये बकुळ, बहावा, बूच, ताम्हण, वड, पिंपळ, चिंच, आंबा, पेरू, काटेसावर आदी देशी झाडांचा समावेश आहे. या परियोजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील नानगाव ब्रँचमधील खुटबाव, लोणावळा ब्रँचमधील कामशेत आणि भोसरी येथील दत्तगड दिघी येथे चार हजार इतकी झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षारोपण करण्यासाठी मिशनचे ताराचंद करमचंदानी यांनी नियोजन केले आहे.
या वेळी मुख्य संयोजक हनुमंत थोरात, भाऊसाहेब ढमढेरे, सूर्यकांत खैरे, उपसरपंच निखिल थोरात, शिवाजी थोरात, नाना थोरात, शरद शेलार, सचिन शेलार, सुभाष देशमुख, दशरथ थोरात, बळी थोरात, भुजंग थोरात, संतोष थोरात आदी उपस्थित होते.