पूर्व भागाच्या अनेक गावांतील शिवरस्ता, पानंदरस्ता खुला करण्यासाठी व अन्नधान्य पुरवठा (रेशनिंग) व्यवस्थित होण्यासाठी येणाऱ्या काळात मोहीम आखू असेही चोबे यांनी केले. सामान्य जनतेच्या हिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक कैलास भोरडे व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा तहसीलदार चोबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी सरपंच प्रभाकर भोरडे, उपसरपंच मंदा मांडे, ग्राहक पंचायत महसूल विभाग रमेश टाकळकर, राघवदास चौधरी, माजी सरपंच बाळासाहेब भोरडे, दत्तात्रय सातव, राजू वारघडे, ग्रामविकास अधिकारी चव्हाण, तलाठी पवनकुमार शिवले, कृषी सहाय्यक गाडे, संदीप शिवरकर, विठ्ठल ठोंबरे, गणेश सातव, कैलास भोरडे तसेच ग्रामपंचायत माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. या सूत्रसंचालन विठ्ठल ठोंबरे यांनी केले. आभार संदीप शिवरकर यांनी मानले.
--
२१पिंपरी सांडस वृक्षारोपण
वृक्षारोपण करताना तहसीलदार विजयकुमार चोबे.