या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, माजी पंचायत समिती सदस्या माधुरी गुंजाळ, रामभाऊ बोरचटे, धोंडिभाऊ पिंगट, विश्वनाथ डावखर, सरपंच गोरक्षनाथ वाघ, उपसरपंच नीलेश कणसे, प्राचार्य रोहिदास बेलकर, वसंत जगताप, विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मनीषा पुरी-गोसावी, उद्योजक राजन पुरी, बन्सी डावखर, अशोक घोडके, वृक्षवेध फाउंडेशनचे बाबाजी गव्हाणे उपस्थित होते.
बेल्हा परिसरात माजी विद्यार्थ्यांच्यावतीने ‘बेल्हेश्वर आशीर्वाद वृक्ष’ उपक्रमांतर्गत लोखंडी सुरक्षा जाळ्यांसह एकूण ४ हजार झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे बेल्हेश्वर आशीर्वाद वृक्ष उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक सुनील चोरे यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माया गुंजाळ, सावकार पिंगट, शेखर विधाटे, दिनेश पाबळे, गणेश बांगर, किशोर अभंग, राहुल केदारी, राकेश शिंदे, स्वप्निल मुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.