जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केला निश्चय
--
यवत : भुलेश्वर डोंगर परिसरात वृक्षांची लागवड आणि संवर्धन करून जंगल निर्माण करण्यासाठी यवत ग्रामपंचायत वन विभाग व हरितवारी फाउंडेशन संयुक्त योगदान देणार असून गावातील तरुण हरीत हिरोंच्या माध्यमातून भविष्यात येथे दाट जंगल करण्याचे ध्येय असल्याचे सरपंच समीर दोरगे यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने यवत ग्रामपंचायत, वन विभाग व हरितवारी फाउंडेशन यांनी संयुक्त उपक्रम राबवित भुलेश्वर डोंगररांगामध्ये ५० मोठ्या देशी वृक्षांची लागवड केली. यावेळी सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, यवतचे वनपाल जी. एम. पवार, वनरक्षक सचिन पुरी, दीपाली पिसाळ, सुनीता शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे, सुजाता कुदळे, लंका कोळपे, कोमल कदम, उज्ज्वला शिवरकर, मंदाकिनी कुदळे, सोमनाथ रायकर, विकास दोरगे, दीपक तांबे आदी उपस्थित होते.
हरितवारीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वड, पिंपळ, कडूलिंब, करंजे, चिंच, जांभूळ आदी देशी वृक्षांची लागवड केली जात आहे. झाडे लावताना लहान रोपे न लावता मोठी झालेली झाडे नर्सरी मधून आणून लावली जातात. यामुळे रोपांना लावाव्या लागणाऱ्या लोखंडी जाळी अथवा कुंपण याचा खर्च वाचतो तसेच लवकर झाडे मोठी होऊ लागतात.
--
फोटो क्रमांक : ०५यवत भुलेश्वर डोंगर वृक्षारोपण
फोटो ओळ : भुलेश्वर डोंगर परिसरात जंगल करण्याचे ध्येय निश्चित केल्यानंतर वृक्षलागवड कार्यास प्रारंभ करताना सरपंच समीर दोरगे , उपसरपंच सुभाष यादव, वनपाल जी. एम. पवा , हरितवारी फाउंडेशनचे युवक आदी.