संस्थेकडून दरवर्षी रमजाननिमित्त इफ्तार पार्टी, सामुदायिक शुभविवाह सोहळा, क्रीडा स्पर्धा, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे यांसारख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. सध्याच्या कोरोनाच्या संकटात संस्थेने गरीब गरजू लोकांना अन्नधान्य, किराणा तसेच कोरोना योध्यांना मास्क,सॅनिटायजरचे वाटप केले.
संस्थचे अध्यक्ष पांडुरंग पवार सचिव गणपत घोडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष गाडगे यांच्या शुभ हस्ते आंब्याच्या झाडांचे रोपण करण्यात आले. आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालय परिसरामध्ये नारळ, आंबा, जांभूळ, पाम, फायस्कस, पिंपळ, अशोक, पारिजात, पेरू, फुलझाडे आणि औषधी वनस्पती यासारख्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे.
यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत गाडगे, संदीपान पवार, कविता पवार, प्रा. अनिल पडवळ, प्रा. छाया चक्कर, प्रा. आशिष गाडगे, मंगल उनवणे, योगेश देवकर, शांताराम गाडगे, वैभव घोडे, विजय लामखडे, विघ्नेश लामखडे, मनीषा लामखडे, अश्विनी पवार आदी उपस्थित होते.
---
फोटो क्रमांक : २८ बेल्हा निमगाव सावा आंबा लागवड
फोटो क्रमांक - निमगांवसावा (ता.जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात झाडे लावताना पांडुरंग पवार व अन्य पाहुणे
280721\28pun_4_28072021_6.jpg
फोटो क्रमांक : २८ बेल्हा निमगाव सावा आंबा लागवडफोटो क्रमांक - निमगांवसावा (ता.जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात झाडे लावताना पांडुरंग पवार व अन्य पाहुणे