तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आणि शिरूर तालुका निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने अजित रणसिंग व प्रवीणकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण उद्योजक सागर भाडळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक अजित रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी शिरूर तालुका निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष पी. बी. जगताप, समता विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक शंकर मुनोळी, आनंदाश्रम प्राथमिक शाळेच्या अधीक्षिका विजया अहिरे, सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ करेकर,दीपक भुजबळ,केशव पवार,संदीप खेडकर,उदय नरके,जितेंद्र भोई उपस्थित होते. वाघोलीचे उद्योजक सागर भाडळे यांच्या वतीने शंभर रोपे वृक्षारोपणासाठी देण्यात आली. आनंदाश्रम शाळेच्या परिसरात व भैरवनाथनगर येथील स्मशानभूमीच्या परिसरात ऑक्सिजन देणारे आणि औषधी गुणधर्म असणारे लक्ष्मीतरूचे ५० व बेल,कडूलिंब,चिंच,आवळा,वड पिंपळ जांभूळ या वनस्पती ५० अशा एकूण १०० वनस्पतींचे रोपण करण्यात आले.
०५ तळेगाव ढमढेरे
पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना राजेश माळी, सागर भाडळे, अजित रणसिंग व इतर.