बारामती : वाढती दुष्काळाची दाहकता दूध व्यवसायाच्या मुळावर आली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते; तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणीही वाढते. त्यामुळे दुधाचे खरेदी दरही वाढतात. दूध खरेदीदराबाबत खासगी, सहकारी संस्था व शासन प्रतिनिधींमध्ये होणारी बैठक काही कारणांमुळे लांबणीवर पडली. त्यामुळे दूध खरेदी दर वाढणार का? या चिंतेने दूध उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.
राज्य शासनाकडून मिळणारे दूध अनुदान मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. ३ एप्रिलला दूधदराबाबत खासगी व सहकारी संस्थांची व राज्या शासन प्रतिनिधींची बैठक होणार होती, अशी माहिती एका खासगी दूध संस्थेच्या संचालकाने दिली. या बैठकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागले होते; मात्र काही कारणांनी ही बैठक झाली नाही. सध्या निवडणुकांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळेया प्रश्नाकडे लक्ष द्यायला राज्य शासनास वेळ नसल्याचेही कारण पुढे केले जात आहे.
सध्या बारामती-इंदापूर तालुक्यातील दुग्धव्यावसायिकांना गाईच्या ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या दुधाला २० रुपये दर मिळत आहे. सध्या उन्हाळ्याची दाहकता वाढली आहे. मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने बागायती भागदेखील चारा-पाण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. त्यात ओल्या चाºयामध्ये येणाºया मका व कडवळाचे (ज्वारी) दर गगणाला भिडले आहेत.दूध विक्रीपासून काहीच नफा होत नसल्याने चारा खरेदी करणार कोठून, असाही प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. ओला मका १ हजार २०० रुपये प्रतिगुंठा दराने विक्री केला जात आहे. मागील वर्षी जिरायती भागामध्ये पावसाअभावी ज्वारीच्या पेरण्या अत्यल्प झाल्या होत्या; तसेच काही पिके नंतर पाण्याअभावी जळून गेली. त्यामुळे यंदाच्या वर्षी कडबा पाहायला देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच, ५० किलो पशुखाद्याची एक गोणी १ हजार २०० रुपयांना मिळत आहे. सध्या दुधाला २० रुपये दर मिळत आहे. राज्य शासनाने याआधी प्रतिलिटर ५ रुपये त्यानंतर ३ रुपये असे अनुदान शेतकºयांना देण्याची घोषणाकेली होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून या अनुदानाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. शासनाकडून देण्याते येणारे ३ रुपये प्रतिलिटर
अनुदान जरी दूध उत्पादकाला मिळाले तरी दूध व्यवसायातील तोटा भरून निघत नसल्याचे वास्तव आहे. चाराटंचाई, पडलेले दुधाचे दर, वाढता दुष्काळ, घटलेले दूध उत्पादन यामुळे परिसरातील जनावरांच्या बाजारात देखील मंदी निर्माण झाली आहे. जनावरांच्या किमती ५० टक्क्यांनी घटल्या आहेत. त्यामुळे पशुपालक दुहेरी संकटात सापडला आहे.अर्थकारण कोलमडले...दिवसाकाठी सरासरी १८ लिटर दूध देणाºया एका विदेशी वंशाच्या गाईवर शेतकºयाला चारा, पशुखाद्य, औषधे, मजुरी व इतर खर्च धरता दिवसाला ३५० रुपये खर्च करावा लागतो. त्या गाईचे १८ लिटर दूधाची किंमत सध्याच्या दरानुसार फक्त ३६० रुपये इतकी होते. म्हणजे शेतकºयाच्या हातात एका गाईचे फक्त १० रुपये राहतात. दुष्काळी भागात तर शेतकºयाला फक्त शेणावरचभागवावे लागत असल्याचे वास्तव आहे.शासन प्रतिनिधींनी शेतकºयांच्या गोठ्यावर जाऊन दूधधंद्याच्या सद्य:स्थितीचा अभ्यास करावा. म्हणजे नेमकी परिस्थिती समोर येईल. दूध खरेदी दरामध्ये वाढ करताना ज्यावेळी चर्चा केली जाते. त्यावेळी दोन-चार दूध उत्पादक शेतकºयांना देखील बोलवावे. फक्त खासगी व सहकारी संस्था चालकांच्या सल्ल्याने दूध खरेदी दर ठरवला जाऊ नये.- तुकाराम देवकातेदूध उत्पादक शेतकरी, लासुर्णे, ता. इंदापूरदुष्काळामुळे यंदा पाण्याची कमतरता आहे. साहजिकच त्यामुळे उष्णताही वाढली आहे. या वातावरणात विदेशी वंशाच्या गाईंची जास्त ताकद शरीराची उष्णाता कमी करण्यासाठी जाते. त्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट होते. त्यासाठी जनावरांना पुरेसा थंड निवारा व थंड पाणी, ओला चारा प्रमाणात दिल्यास दूध उत्पादन वाढवता येऊ शकते.- डॉ. रमेश ओव्हाळपशुसंवर्धन अधिकारी, बारामती तालुका