राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती खेड तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत, महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला समूह यांनी पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ३ हजार केशर आंब्यांच्या झाडांचे वृक्षारोपण केले.
बचत गटातील प्रत्येक महिलेने परसबागेत, शेतात आंब्याचे झाड लावले आहे. त्या झाडांचे संगोपन व जोपसना करून त्या झाडांपासून मिळणारे उत्पन्न या महिलांना मिळणार आहे .बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी दोन लाख ७० हजारांची स्व:खर्चाने आंब्याची झाडे खरेदी केली असल्याचे लतिका भालेराव यांनी सांगितले.
तालुक्यातील काळूस, पाडळी, दावडी, शिरोली, वाकी खुर्द, निमगाव, वाफगाव, रेटवडी, जऊळके बुद्रुक, शेलगाव, वरूडे, गुळाणी, साबळेवाडी, म्हाळूगे, सांगुर्डी, कान्हेवाडी तर्फे चाकण, केळगाव, दोंदे, चऱ्होली खुर्द, चिखलगाव, वाडा, मोरोशी, वडगाव या गावांतील बचत गटातील महिलांनी वृक्षारोपण केले.
पंचायत समिती गटविकास अधिकारी अजय जोशी, विस्तार अधिकारी सांख्यिकी अनिता ससाने सुभाष भोकटे, तालुका अभियान व्यवस्थापक लतिका भालेराव, प्रभाग समन्वयक आम्रपाली पाटील ,शिवाजी तेलंगे,अनिल वखरे ,
रवींद्र भांगरे व अभिजित माळवदकर यांनी वृक्षलागवड यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
०५ राजगुरुनगर
बचत गटातील महिलांना रोपटे देताना गटविकास अधिकारी अजय जोशी व इतर.