अनाहत स्वराज्य सामाजिक संस्था, रक्ताचं नातं ट्रस्ट आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अपूर्वा ठाकरे यांनी आतापर्यंत ३० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांना बेड, अनेकांना ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन, तर ४० हून अधिक रुग्णांना प्लाझ्मा देण्यात यशस्वी झाल्या आहेत.
तसेच अनाथ रुग्णांच्या अंत्यविधीसाठी कुणी नसताना त्या स्वत: स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहत आहेत. याकरिता रेणुका खेर, ओंकार भोसले, जयदीप सूर्यवंशी, प्रवीण शिंदे, विशाल जगदाळे, विक्रम पाटील, सचिन कोळी, राम बांगड, सविता इटकरकर यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली वरील अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
गुरुवारी एकाच दिवसात अपूर्वा ठाकरे यांनी सुनील गायकवाड, आशिष पासलकर, अनिल बारावकर या तिघांना प्लाझ्मा दानासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांनी सुद्धा प्लाझ्मा दान केलं. त्यांच्या या कामामुळे रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देणे शक्य झाले.