जेजुरी : राज्य शासनाने जाहीर केलेली प्लॅस्टिकबंदी राबवण्याचा जेजुरी नगरपालिकेने निर्णय घेतलेला असून त्याबद्दल जनजागृतीही करण्यात आलेली आहे. त्यानंतर ही प्लॅस्टिक वापरण्यात येत असल्याने पालिकेकडून त्यांच्यावर कारवाईही केलेली आहे. मात्र अजूनही पूर्णपणे प्लॅस्टिकबंदीला प्रतिसाद मिळत नसल्याने याबाबतची कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी सांगितले.
शासनाच्या प्लॅस्टिक आणि अविघटनशील कचरा नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी मोहीम जेजुरीत २३ मार्चपासून राबवण्यात येत आहे. त्यासाठी संपूर्ण शहरात घरोघरी, प्रत्येक व्यापारी यांच्याशी संपर्क साधून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबरओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी डस्टबिनचेही वाटप करण्यात आले आहे. वेळोवेळी आवाहन व सूचनाही केल्या जात आहेत. यानंतरही प्लॅस्टिक वापर करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाईही केली आहे. ११ सप्टेंबरपासून आजपर्यंत प्लॅस्टिकचा वापर करणाºयांवर कारवाई करीत सुमारे १ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.नुकतीच २८ सप्टेंबरला शासनाच्या प्रदूषण महामंडळाच्या विभागीय अधिकारी नितीन शिंदे व एस. जी. भोई यांच्याकडून जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पालिकेच्या स्वच्छता विभागाचे बाळासाहेब बगाडे, प्रसाद जगताप, राजेंद्र गाढवे, सुनील दोडके यांच्यासह शहराची अचानक पाहणी केली होती. प्लॅस्टिकबंदीबाबत सहकार्याचे आवाहनही केले. पाहणीनंतर प्लॅस्टिकमुक्ती अभियानाबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर हे अभियान अजूनही तीव्र करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. त्यानुसार यापुढेही हे अभियान अधिक तीव्रतेने राबवण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे.सहकार्य करण्याचे आवाहनप्लॅस्टिकबंदी अभियानांतर्गत प्लॅस्टिकबंदी करण्यात आली आहे. प्लॅस्टिक वापर करताना आढळल्यास प्रथम ५००० रुपये दंड, दुसºयांदा सापडल्यास १० हजार आणि तिसºयांदा आढळल्यास २५ हजार रुपये दंड व तीन महिने कारावास अशी शिक्षा आहे. नागरिकांनी याबाबत सहकार्य करून कटुता टाळावी, असे आवाहनही मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे.