पुणे : विभागीय आयुक्त स्तरावरून प्लॅस्टिक उत्पादनांच्या उगमस्रोतांवर नियंत्रण आणण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांमध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शनिवारी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना यासंदर्भातील कामांचे वाटपही करण्यात आले .राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे विभागात प्लॅस्टिकबंदीबाबत कारवाईला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्याच्या उद्योग विभागाने प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्यात येणारी केंद्रे शोधूनअशा केंद्र्रांवर प्लॅस्टिक गोळा करण्यात यावे, अशा सूचना विभागस्तरावर दिल्या आहेत. त्यानुसार पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रविवारपासून कारवाईला वेग येणार आहे.विभागीय आयुक्तालयाकडून पाचही जिल्हा परिषदांमध्ये प्लॅस्टिकबंदीबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यशाळेच्या माध्यमातून प्लॅस्टिक, थर्माकोल उत्पादनांच्या उगमस्थानांवर नियंत्रण आणण्याचे प्रशिक्षण दिले आहे.जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समित्यांनी प्लॅस्टिक बंदीबाबत कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी, याबाबत कामांची माहिती देण्यात आली आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी सांगितले.
Plastic Ban : विभागीय आयुक्त प्लॅस्टिकबंदीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 3:57 AM