शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

पालेभाज्यांचे भाव तेजीतच

By admin | Published: June 04, 2017 5:33 AM

शेतकरी संपाचे सावट शनिवारी शहरावर अधिक गडद झाल्याचे दिसून आले. संपाची तीव्रता कायम असून भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव तेजीच राहिले.

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शेतकरी संपाचे सावट शनिवारी शहरावर अधिक गडद झाल्याचे दिसून आले. संपाची तीव्रता कायम असून भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव तेजीच राहिले. संप मिटल्याबाबत संभ्रमावस्था असल्याने रविवारीही बाजारात आवक कमीच होण्याची शक्यता असल्याने गगनाला भिडलेले भाज्यांचे भाव स्थिर राहतील. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशीही शहरात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असुन सर्व भाज्यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह खानावळी, हॉटेल चालकांना संपाचा चांगलाच फटका बसला आहे. मार्केटयार्डातील घाऊक बाजारातून अनेक किरकोळ विक्रेते, खानावळ, हॉटेल चालक भाजीपाला खरेदी करतात. मात्र, शनिवारी बाजार बंद असल्याने भाज्यांसाठी सर्वांचीच धावपळ उडाली. शहराच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला विक्रीसाठी आणण्यात आला होता. त्यामुळे याठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने चढ्या भावाने भाज्यांची खरेदी करावी लागली. माल न मिळाल्याने काही विक्रेत्यांना भाज्यांची विक्री करता आली नाही. त्यामुळे ग्राहकांचीही तारांबळ उडाली. शेतकऱ्यांमध्ये संभ्रमकाही शेतकरी संघटनांनी शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा केली असली तरी अनेक भागात शेतकऱ्यांनी संपात सहभाग कायम असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शनिवारी मार्केटयार्डातील अनेक व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी संपर्क साधून बाजार सुरू असल्याबाबत खातरजमा केली. शेतकऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीवर बाजारात माल आणावा, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. ज्येष्ठ आडते विलास भुजबळ म्हणाले, मार्केटयार्डात पुणे जिल्ह्याशिवाय विविध भागात भाजीपाल्याची आवक होते. या भागातील शेतकऱ्यांनी संपर्क साधून बाजाराच्या स्थितीची माहिती घेतली. काही भागातील शेतकऱ्यांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे रविवारीही बाजारात आवक कमी होण्याची शक्यता आहे. मागणीच्या तुलनेत होणारी आवक कमी असल्याने भाव तेजीच राहतील.दूध पुरवठा विस्कळीतशेतकरी आंदोलनामुळे शनिवारी शहरातील पिशवीबंद दूधाचा पुरवठा विस्कळीत झाला. शहरात दररोज येणाऱ्या सुमारे १५ लाख लिटरपैकी ६० ते ६५ टक्के वाटा पिशवीबंद दूधाचा असल्याने दूधटंचाईची तीव्रता जाणवली. दूध टंचाईमुळे गणेशपेठ दूधभट्टीत एका लिटरला तब्बल ७४ रुपये भाव मिळाला. शहरात नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि जिल्ह्यातील विविध भागातून दूधाचा पुरवठा होतो. शहर हद्दीलगतच्या गावांतून घरोघरी दूधवाटप करणाऱ्या गवळ््यांचा वाटा देखील जवळपास ३५ टक्के इतका आहे. त्यांच्याकडून दूधपुरवठा झाल्याने दूध आणीबाणी टळली. शहरातील मध्यवस्तीत दूध पुरवठा करणाऱ्या गणेशपेठ दूधभट्टीत केवळ २ ते अडीच हजार लिटर दूधाची आवक झाल्याने, दूधाला लिटरमागे ७४ रुपयांचा भाव मिळाला. दूधाला प्रथमच इतका भाव मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या विषयी माहिती देताना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज) व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, शेतकरी आंदोलनामुळे येथील दूधाची आवक २ लाख २५ हजार लिटरवरुन १ लाख २५ हजार लिटर पर्यंत खाली घसरली. आंदोलन सुरु असेपर्यंत अधिकाधिक दूध वितरणावर भर देण्यात येईल. गणेशपेठ दूध-खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे म्हणाले, येथील दूध संकलन ८ हजार लिटरवरुन अडीच हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. दूध टंचाईमुळे १८ लिटर्सच्या घागरीस १ हजार ३२० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. एका लिटरला ७४ रुपयांचा भाव मिळाला. ईद, राखी पोर्णिमा आणि दसऱ्याला दूधाला अधिक मागणी असते. गेल्यावर्षी १८ लिटरच्या घागरीस १ हजार २०० रुपयांचा (एका लिटरला ६७ रुपये) भाव मिळाला होता.शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास चार लाख लिटर दूधाची आवक थंडावली होती. त्यामुळे शनिवारी वितरणावर त्याचा परिणाम झाला. काही शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर दूधाचे टँकर बोलाविले आहेत. त्यामुळे रविवारपर्यंत स्थिती सुरळीत होणे अपेक्षित आहे. - श्रीकृष्ण चितळे, दूध आणि मिठाई विक्रेते