पुणो : ‘सिंघम’ अजय देवगण आता मराठी चित्रपट निर्मात्याच्या रुपात महाराष्ट्रात ‘विटी दांडू’ खेळण्यासाठी येतोय. त्याला भेटण्याची संधीही ‘लोकमत युवा नेस्ट’ने उपलब्ध करून दिली आहे. या निमित्ताने आयोजित एका विशेष स्पर्धेमधील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणा:यांना ही संधी मिळणार आहे. लोकमत युवा नेक्स्ट, स्टार नमकीन व संजय घोडावत ग्रृपने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मराठी चित्रपट सध्या आशयाच्या आणि विषयांच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर नावाजला जातोय. याची दखल अजय देवगण यांनीही घेतली असून प्रथमच मराठी चित्रपाच्या निर्मितीमध्ये ते उतरले आहेत.
‘विटी दांडू’ या वेगळ्या विषयावरील चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकमत युवा नेक्स्ट’ने ही अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून राज्याच्या विविध भागांमधून 5 विजेते निवडण्यात येणार आहे.
राज्यातील पश्चिम, दक्षिण, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश असे 5 विभाग आहेत. या 5 विजेत्यांना केवळ अजय देवगणची भेटच मिळणार नाही तर त्याच्यासोबत विटी दांडू खेळण्याची अभूतपूर्व संधीही
मिळणार आहे.
कोल्हापूरमध्ये संजय घोडावत शिक्षण संकुलात 19 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. (प्रतिनिधी)