पुणे : दिवाळीच्या सणात अनेक वेळा लहान-मोठे देखील उत्साहाच्या भरात फटाक्यांची आतषबाजी करताना भान विसरून जातात. दरवर्षी ऐन सणा-सुदीच्या काळात लहान-मोठे अपघात होतात. त्यामुळे दिवाळीचा सण खºया अर्थाने गोड करण्यासाठी फटाके वाजविताना सुरक्षिततेला अधिक महत्त्व देत काळजी घ्या, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.डॉ. निखिल पानसे म्हणाले, ‘‘दिवाळीत फटाके वाजविताना थोडी काळजी घेतली तर अनेक अपघात टाळता येऊ शकतात. बच्चे कंपनीने फटाके वडीलधाºयांच्या उपस्थितीतच वाजवावेत, मोठ्या व्यक्तींचे लहान मुलांकडे लक्ष असेल तर दुर्घटना घडल्यास तातडीने उपाययोजना करता येतील, फटाके उघड्या पटांगणात फोडावेत, त्यामुळे आजूबाजूच्या वस्तूंना आग लागण्याची शक्यता कमी होते, मोठे फटाके, बाँब, तोटे, रॉकेट या प्रकारचे फटाके लहान मुलांना फोडण्यासाठी देऊ नयेत, फटाके शरीरापासून सुरक्षित अंतरावर प्रज्वलित करावेत, पादत्राणे घालूनच फटाके वाजवावे, फटाके फोडण्याच्या जागेवरच थंड पाण्याची बादली भरून ठेवावी. त्यामुळे दुर्दैवाने कोणास भाजले तर जखमेवर ताबडतोब पाणी टाकता येईल.फटाके लावताना वाकू नका, फटाक्यापासून येणारी ठिणगी डोळ्यात जाऊन अंधत्व येऊ शकते, न फुटलेले, न वाजलेले फटाके पुन्हा लावण्याचा प्रयत्न करू नका. फटाके हातात धरून फोडण्याचा प्रयत्न करू नका, विशेषत: झाड हातामध्ये फुटून गंभीर जखम होण्याचे प्रकार नेहमी आढळतात. मोठा आवाज तसेच कोणत्याही दिशेने फुटणारे फटाके वापरू नका, असे पानसे म्हणाले़
फटाके वाजवा; पण जपून, वैद्यकीय तज्ज्ञांंचे आवाहन, अपघात टाळण्यासाठी दक्षता गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 2:53 AM