शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

एसटीच्या तक्रारींचा वाचला पाढा

By admin | Published: January 23, 2016 2:33 AM

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैैठकीत सदस्यांनी जिल्ह्यातील एसटी महामंडळाविषयी तक्रारींचा पाढा वाचला. ग्रामीण भागात बस नाहीत, थांबा नाही, अशा अनेक तक्रारी त्यांनी केल्या.

पुणे : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैैठकीत सदस्यांनी जिल्ह्यातील एसटी महामंडळाविषयी तक्रारींचा पाढा वाचला. ग्रामीण भागात बस नाहीत, थांबा नाही, अशा अनेक तक्रारी त्यांनी केल्या.सदस्यांच्या मागणीनुसार स्थायी समितीच्या बैैठकीला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. या वेळी सदस्यांनी आपापल्या भागातील मागण्या केल्या. राष्ट्रवादीचे गटनेते शांताराम इंगवले यांनी दोन महिने पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याचे सांगत मुळशीतील दासवे येथे सकाळी येणारी एसटी तेथून न वळवता ती दोन किलोमीटर असलेल्या बोहिणी गावापर्यंत न्यावी, अशी मागणी केली. बोहिणी गावातील सकाळी शाळेसाठी दासवेला येणाऱ्या १५ ते २0 विद्यार्थ्यांना पायी यावे लागते. त्यामुळे लवकरात लवकर बोहिणीला किमान सकाळची फेरी तरी मारावी, अशी मागणी केली. जुन्नरच्या शिवसेनेच्या सदस्या आशा बुचके यांनी, पुणे- नाशिक एसटी बस नारायणगावला थांबा घेत नाही, त्यामुळे येथून पुढे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. तिला थांबा द्यावा तसेच आळंदी ते जुन्नर एसटी बस नव्याने सुरू करावी तसेच तांबे-पाडळी एसटी बसची मागणी केली. शिरूरचे सदस्य दादासाहेब कोळपे यांनी, नगरला जाणाऱ्या बस शिरूर स्थानकात थांबत नाहीत, त्या महामार्गावरूनच जातात. हा प्रश्न आम्ही गेली अनेक वर्षे मांडत आहोत, मात्र महामंडळ याची दखल घेत नाही, अशी तक्रार केली.या वेळी उपस्थित एसटीचे अधिकारी दत्तात्रय जोशी यांनी, येथे केलेल्या मागण्या व तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून दखल घेऊ, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)