ऑर्किड सोसायटीच्या उतारावर रस्त्याच्या बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी कुठलीही ड्रेनेज चारी काढलेली नाही. पावसाळ्यात सदरील रोडवर आजूबाजूचे टेकडीवरून दगडगोटे वाहत येऊन या दगडगोट्यावरून वाहने घसरण्याची भीती वाटते असे लोकांनी बोलून दाखवले. रस्त्याला कुठेच सुरक्षित कठडे नाहीत. क्लाउड नाईन सोसायटी ते रॉयल हेरिटेज मॉल रोडवर काही ठिकाणी रोडवर खडे पडलेले आहेत. रस्त्याचे डागडुजी केली पण वरवरचे केले खड्डे तसेच आहेत.
काही ठिकाणी खडबडीत रोड असून वाहन चालवताना नागरिकांना कटकटीचे होते. त्यात रोड अरुंद बऱ्याच वेळा ट्रॅफिक जाम होते. रॉयल हेरिटेज मॉलकडून महंमदवाडीच्या मुख्य रोडला मिळतो. या रोडवर बऱ्याच ठिकाणी खडे आहेत. शिवाय रोडचे मध्येच मोठा खड्डा पडलेला असून तो झाडाचे फांद्यानी झाकला असून, रात्रीचे वेळी अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच रोडचे बाजूला ओढा वाहत येत असून ओढ्यावरील सुरक्षा भिंत बऱ्याच महिन्यांपासून पडलेली आहे. तेथील रहिवाशांनी भिंत बांधावी यासाठी तक्रार केली. पण अद्यापपर्यंत सुरक्षा भिंत बांधलेली नसून पावसाळ्यात ओढ्याचे पाणी रस्त्यावर येणार आणि आम्हाला जाण्या येण्याचा त्रास नक्कीच होणार असे लोक सांगत होते. हा सर्व भाग पुणे महानगरपालिकेत समाविष्ट आहे तरीही रस्त्याची दुर्दशा अशी आहे. पालिकेने पावसाआधीच आमच्या भागातील रस्त्याची कामे लवकरात लवकर वेळेत करावी आणि या समस्येतून दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.