पिंपरी : प्रवाशांच्या तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेला ‘प्रवासी दिन’ मागील काही महिन्यांपासून केवळ कागदावर उरल्याचे चित्र होते. आता पुन्हा हा दिवस अधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने पावले उचलली आहेत. प्रवासी दिन केवळ आगारांपुरता मर्यादित न ठेवता पुणे व पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख २३ बसस्थानकांवरही आयोजित केला जाणार आहे.बससेवा अधिक चांगली करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने पुन्हा बसस्थानकांवर प्रवासी दिन आयोजनाची पावले उचलली आहेत. त्यानुसार दोन्ही शहरांतील २३ प्रमुख बसस्थानकांवर प्रवासी दिनाचे आयोजन केले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रवाशांना या स्थानकांवर आपल्या तक्रारी, हरकती, सूचना नोंदविता येणार आहेत. या बसस्थानकांव्यतिरिक्त १३ आगारांमध्येही प्रवाशांना सूचना मांडता येणार आहेत. या स्थानकांवर अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे, अशी माहिती पीएमपीचे महाव्यवस्थापक (संचलन) अनंत वाघमारे यांनी दिली.विविध मार्गांवर, स्थानकांवर प्रवाशांना चांगली, तत्पर सेवा देण्याच्या दृष्टीने प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी व त्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यासाठी पीएमपीतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रवासी दिन आयोजित केला जातो. या दिवशी पीएमपी सर्व आगारांमध्ये प्रवासी दिनामध्ये प्रवाशांशी संवाद साधला जातो. (प्रतिनिधी)प्रमुख बसस्थानकांत होणार प्रवासी दिन वाघोली, महात्मा गांधी स्थानक, स्वारगेट, विश्रांतवाडी, हिंजवडी, डेक्कन, मंडई, खडकी बाजार, शिवाजीनगर, डेंगळे पूल, मनपा भवन, माळवाडी /गणपती माथा, कात्रज, हडपसर गाडीतळ, अप्पर डेपो, मोलेदिना, भक्ती शक्ती, भोसरी, चिंचवड, भेकराईनगर, धनकवडी, भारती विद्यापीठ, आकुर्डी रेल्वे स्टेशन.विविध मार्गांवर, स्थानकांवर प्रवाशांना चांगली, तत्पर सेवा देण्याच्या दृष्टीने प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी व त्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यासाठी पीएमपीतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रवासी दिन आयोजित केला जातो. या दिवशी पीएमपी सर्व आगारांमध्ये प्रवासी दिनामध्ये प्रवाशांशी संवाद साधला जातो. हा दिवस केवळ आगारांपुरता मर्यादित न ठेवता अधिक प्रवासीभिमुख व्हावा, यासाठी पीएमपीचे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांनी दोन्ही शहरांतील प्रमुख बसस्थानंकावर प्रवासी दिन आयोजित करण्यास सुरुवात केली. मात्र, परदेशी यांची बदली झाल्यानंतर काही महिन्यांतच हा दिवस केवळ कागदावरच उरल्याचे चित्र दिसत होते.
पीएमपी होणार ‘प्रवासीभिमुख’
By admin | Published: March 05, 2017 4:29 AM