शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

पीएमपीत 'मेगा बदल्यां'चा धडाका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 11:10 PM

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी  मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी  मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. पीएमपीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहे.  तुकाराम मुंढेंनी गेल्या सहा महिन्यात जवळपास नऊशेच्यावर कर्मचा-यांच्या बदल्या केल्या आहे. त्यातल्या सातशेच्या आसपास बदल्या या दोन दिवसांत केल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष एकाच पदावर काम करत असलेल्या चालक वाहक, लिपिक, वरिष्ठ कार्यालय अधीक्षक, मदतनीस, फिटर, क्लिनर, मॅकेनिक, अशा अनेक पदांवरील कर्मचा-यांचा समावेश त्यात आहे.मुंढे यांनी पीएमपीचा नवीन आस्थापना आराखडा तयार करण्यापासून ते प्रवाशांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यापर्यंत काम केले. पीएमपी बसच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या ठेवण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत राहिलेल्या अनेक कर्मचा-यांकडून कामकाजात कोणतीही सुधारणा नाही तसेच वाहक, चालकांना स्टार्टर, लाईटमन, रिपेअरिंग यांसारखी इतर कामे देण्यात आली होती, असे दुसरे कारण  बदल्यांमागे देण्यात आले आहे. पीएमपीतील वरिष्ठ अधिका-यांच्या मर्जीनुसार हे कर्मचारी कामकाज करत होते. मुंढे यांनी या बदल्या करुन पीएमपीमध्ये चालत आलेली ही मर्जीशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. 

विकासात्मक आकृतीबंध आराखडाच तयार नसल्याने अनेक वर्ष पीएमपीएलमध्ये मनमानीपणे कर्मचा-यांचे काम सुरु होते. तसेच या कालावधीत नवीन पीएमपी कर्मचारी भरती देखील सुरु राहिली. त्यामुळे पीएमपीवरचा आर्थिक बोजा वाढत जाऊन तोट्याचे प्रमाण काही कोटींमध्ये वाढले, अशी माहिती पाीएमपीच्या एका वरिष्ठ अधिका-याने ‘लोकमत’ ला दिली.

बदल्या बेकायदेशीरपीएमपीच्या फेर आस्थापना आराखडा तयार करताना प्रशासनाने औद्योगिक कामगार कायदा ९ अ प्रमाणे मान्यताप्राप्त कामगार संघटनेस आगाऊ लेखी सूचना देणे व चर्चा करणे बंधनकारक आहे. ते न करताना पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी परस्पर नवीन आस्थापना आराखडा तयार केला होता. त्याला इंटक कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात जाऊन स्थगिती घेतली होती. या याचिकेवर ८ डिसेंबरला सुनावणी असताना मंगळवारी कार्यालयीन वेळ संपत असताना सायंकाळी अचानक ६२० कामगारांच्या बदल्या केल्या आहेत. ही बाब न्यायालयाचा अवमान करणारी व कामगारांवर सरसकट अन्याय करणारी आहे, असे पीएमपी कामगार संघाचे सल्लागार गोपाळ तिवारी यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेtukaram mundheतुकाराम मुंढे