पुणे : लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी सन्मानित केले जाणार आहे. येथील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक ज. टिळक, ट्रस्टचे विश्वस्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणारे मोदी हे पहिलेच विद्यमान पंतप्रधान आहेत. शरद पवार यांनाही कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१६ मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पंतप्रधानांचा कार्यक्रमपंतप्रधान मोदी लोहगाव विमानतळावर आगमनानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतील. n पंतप्रधान मोदी मेट्रोच्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रूबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. - पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या २ हजार ६५८ घरांचे लोकार्पण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६,४०० हून अधिक घरांच्या इमारतींचे भूमिपूजन होणार आहे.