पुणे : पंतप्रधान जवाब दो, पंतप्रधान परत जा, मणिपूरला जा, अशा घोषणा मणिपूरी नागरिकांनी महात्मा फुले मंडईसमोर दिल्या. प्रत्येकाने हातामध्ये फलक घेतले होते. त्यात लहान मुलेही सहभागी झाले होते.
इंडिया फ्रंटच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे भेटीचा निषेध करण्यासाठी मंडई इथे मंगळवारी सकाळी आंदोलन केले. त्यात मोदी मणिपूर हिंसाचारावर गप्प का? असा सवाल यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता.
आमच्या मणिपूरमध्ये हिंसाचार होत असताना पंतप्रधान मात्र पुरस्कार स्वीकारत आहेत, हे अतिशय दु:खदायक आहे. एवढा हिंसाचार तिथे होत असताना पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत, हे अत्यंत निषेधार्ह असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी अनेकांनी काळे झेंडे हातात घेतले होते. काहींनी अंगावर कपडेही काळे घातले होते. त्यातून निषेध व्यक्त करण्यात आला.