पुणे: आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपुणे दौऱ्यावर आहेत. हा दौरा सकाळी 10.25 ला सुरू होऊन 2.30 वाजता संपेल. PM मोदी तब्बल ५ तास पुण्यात असणार आहेत. पंतप्रधान मोदी तब्बल ५ तास पुण्यात असणार आहेत. यादरम्यान ते विविध कार्यक्रमात भाग घेणार आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुणे मेट्रोचे उद्घाटन, पी एम पी एम एल च्या 100 इ बस आणि ई बस डेपो चे लोकार्पण, एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान मोदींची सभा असणार आहे.
असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा
सकाळी 10.25 लोहगाव विमानतळावर आगमन
सकाळी 10.45 हेलिकॉप्टर ने कृषी महाविद्यालय येथे आगमन
सकाळी 11.00 मनपा आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
सकाळी 11.30 मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनगरवारे ते आनंदनगर प्रवास करणार
दुपारी 12.00एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान मोदी दाखल होतील
दुपारी 12.30 पी एम पी एम एल च्या 100 इ बस आणि ई बस डेपो चे लोकार्पण
दुपारी 1.45लवळे येथील सिंबोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थिती
दुपारी 2.30 पुणे लोहगाव विमानतळ येथून दिल्ली कडे प्रस्थान