पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते देहूगावातील शिळामंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मोदी वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. वारकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या नेमक्या कोणत्या ते पाहू
वारकऱ्यांनी केलेल्या प्रमुख सात मागण्या-
1. काशी, आयोध्येच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वारकरी साप्रंदायाशी संबंधित सर्व तिर्थक्षेत्र विकसित करा.
2. गंगा नदीच्या धर्तीवर पुंढरपुरातील चंद्रभागा आणि देहू-आळंदीच्या कुशीतील इंद्रायणी नदीसाठी स्वच्छता अभियान राबवावं.
3. पालखी सोहळ तसेच आषाढी कार्तिकी वारीचे नियोजन कंभमेळ्याच्या धर्तीवर करावं.
4. वारकऱ्यांच्या विसाव्यासाठी पालखी मार्गांवर दुतर्फा झाडे लावावीत.
5. तीर्थक्षेत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगळं प्राधिकरण स्थापन करावं.
6. रस्त्यांच्या चौपदरीकरणाबरोबर पालखीचा विसावा तथा मुक्कामाची ठिकाणं विकसित करावीत.
7. संतांबद्दल समाज माध्यमांवर अपशब्द वापरले जाऊ नयेत, म्हणून कठोर कायदा करावा.