पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पवार कुटुंबाची काळजी करण्याची गरज नाही, पवार साहेब आणि कुटुंबीय त्यांचे ते बघतील असे अजित पवार यांनी माेदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना ठणकावून सांगितले.
पुण्यात आघाडीची बैठक काॅंग्रेस भवन येथे पार पडली त्यानंतर पवार माध्यमांशी बाेलत हाेते. वर्धा येथील सभेत माेदी यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला हाेता. त्याला आज अजित पवार यांनी उत्तर दिले. पवार म्हणाले, की, जनतेचे पंतप्रधान 5 वर्ष कारकीर्द पूर्ण झाल्यावर सुसंस्कृत देशाचे पंतप्रधान असे काही बोलतील असे वाटलेही नव्हते. 5 वर्षांपूर्वी ते विकासाबद्दल बोलत होते आता विकासाला फाटा देत आणि आमच्या घरावर उतरले. परिवाराचा प्रश्न आणि देशाचा काय संबंध असेही ते म्हणाले. पवार कुटुंबाची एवढ्या मोठ्या नेत्याला काळजी करण्याचे कारण काय. पवार साहेब आणि कुटुंबीय त्यांचे बघतील. माझ्याकडून झालेल्या 'त्या' विधानावर मी लेखी माफी मागितली, आत्मक्लेश केला तरीही पुन्हा तो मुद्दा काढण्याचे काय कारण असा सवालही त्यांनी विचारला.