पुणे :पुणे शहरातील बहुचर्चित स्मार्ट सिटीने गेल्या आठ वर्षांत १,१४८ कोटी रुपयांचे ४५ प्रकल्प राबविण्यात आले आहेत; पण त्यातील १४ प्रकल्प ३१ जानेवारीपर्यंत पुणे महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. त्यामुळे आठ वर्षांनंतर स्मार्ट सिटीत मोडीत निघाली आहे.
पुण्यात औंध, बाणेर, बालेवाडी हा स्मार्ट प्रभाग घोषित करून त्यात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविले गेले. रस्ते, पदपथ, सार्वजनिक वापरासाठीच्या जागांची निर्मिती (प्लेसमेकिंग), विरंगुळा केंद्र, लाइट हाउस, स्मार्ट सिग्नल यंत्रणा आदी उपक्रम राबविले गेले. २०१६ पासून स्मार्ट सिटीने ॲमेनिटी स्पेसच्या जागेवर विविध प्रकल्प राबविले आहेत. या प्रकल्पाबाबत पालिकेत आयुक्त विक्रम कुमार, स्मार्ट स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजीव कोलते यांच्यामध्ये बैठक झाली. स्मार्ट सिटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, एकूण ४५ प्रकल्प करण्यात आले आहेत. त्यातील काही प्रकल्प यापूर्वीच महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता पुढील २० दिवसांत १४ प्रकल्प हस्तांतरित केले जातील, तर आयटीएमएस, हेल्थ मॅनेजमेंट सिस्टिम, डिजिटल स्कूल एज्युकेशन सिस्टिम असे प्रकल्प अजून पूर्ण झालेले नाहीत. यांचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. स्मार्ट सिटी कंपनीकडून केंद्राने आपल्या निधीवरील व्याज परत घेतले आहे. या व्याजाची सुमारे ५८ कोटी रुपये केंद्राने परत घेतले आहेत. परिणामी, स्मार्ट सिटी कंपनीला आपल्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी निधीची चणचण भासू लागली आहे, ही रक्कम महापालिकेने द्यावी, अशी मागणी स्मार्ट सिटीने केली होती; पण महापालिकेने त्यास नकार दिल्याने आता शासनाच्या नगरविकास खात्याकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
१४ प्रकल्प होणार स्थलांतरित
एन्व्हायर्नमेंट पार्क
पार्क फॉर स्पेशल एबलड्
रिन्यूव गार्डन
एनर्जाइज गार्डन
डिफेन्स थीम
वॉटर कॉन्झर्वेशन
ओपन गार्डन
रिॲलिटी पार्क
कम्युनिटी फार्मिंग
बुक झेनिया
स्मार्ट फार्मिंग मार्केट
सायन्स पार्क
सीनिअर सिटिझन पार्क,
फिटनेस ॲण्ड रिझ्युनिशेन