पुणे : नगर रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिल्लक असलेली १.८ किलोमीटरवरील बीआरटी मार्ग पुणे महापालिकेने मध्यरात्री कारवाई करून उखडला. नगर रोडवर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातूनच अनेकदा अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील शिल्लक असलेले बीआरटी मार्ग काढून टाकावा अशी मागणी सातत्याने होत होती.
त्यासाठी पुणे महापालिकेने गोखले इन्स्टिट्यूटची अहवालासाठी नियुक्ती केली होती. त्यावर गोखले इन्स्टिट्यूटने पुणे-नगर महामार्गावरील पर्णकुटी, येरवडा ते फिनिक्स मॅाल, विमाननगर या टप्प्यातील मेट्रो कामामुळे बंद पडलेल्या बीआरटी काढण्याचा अहवाल महापालिकेला दिला.
त्यामुळे महापालिकेने मध्यरात्री बीआरटी उघडून टाकली. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली