शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सात हजार तीनशे नव्वद काेटींचे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 12:46 PM

पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. गेल्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत ११०० कोटींनी फुगविण्यात आले आहे.

पुणे : स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक मुख्य सभेला बुधवारी सादर केले. तब्बल ७ हजार ३९० कोटींचे हे अंदाजपत्रक गेल्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत ११०० कोटींनी फुगविण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील अडीच हजार कोटींची आलेली तूट पाहता फुगविलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी काशी होणार याकडे लक्ष लागले आहे. 

यावेळी बोलताना रासने म्हणाले, गेल्या 10 वर्षातील अंदाजपत्रकांचा आढावा घेतला असता उत्पन्न आणि खर्च यामध्ये तफावत असल्याचे आढळले. त्यामुळे उत्पन्न वाढीवर भर देण्यात येणार आहे. या अंदाजपत्रकात थकबाकीसाठी अभय योजना, लवादाची नियुक्ती, ठाणे महापालिकेच्या धर्तीवर सदनिका धोरण ठरवणे, बांधकाम परवाना प्रक्रिया शुल्काची रक्कम तीन टप्प्यात आकारणे, 200 ठिकाणी उन्नत पादचारी मार्ग विकसित करणे, तेथे जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळविणे, उद्याने, उड्डाणपूल येथे जाहिरात हक्कातून उत्पन्नाचे नियोजन करण्यात आले आहे. महसूल वाढीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून तूट कमी करण्याचा विचार सुरू आहे. मिळकत कराच्या माध्यमातून सर्वाधिक1200 तर 1400 कोटींचे उत्पन्न मिळते. त्यावर व्यवस्थित काम केल्यास 2500 ते 3000 कोटींचे उत्पन्न मिळू शकते.

पीएमपी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्याकरिता दिवसभरात 10 रुपयात प्रवास ही नवी घोषणा आणण्यात आली असून मध्यवर्ती भागात वाहतुकीसाठी मिडी बस भाडेतत्वावर आणणार असल्याचे रासने यांनी संगितले. यासोबतच गतिमान वाहतुकीसाठी एक रस्ता एक एकक हे धोरण राबविणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात 3041 बसेस आणण्याचे नियोजन आरोग्य सेवा अधिक सक्षम करणार असून पालिकेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील हौदांचे पुनरुज्जीवन, दिव्यांगांसाठी सुषमा स्वराज संवेदना पार्क उभारण्यात येणार आहे. स्पर्श, वास, घ्राण आणि श्रवण यांच्या माध्यमातून वनस्पतींचें ज्ञान या पार्कमध्ये देण्यात येणार आहे. पाण्याचा नियमित पुरवठा, भामा आसखेड योजना मार्गी लावण्याचे नियोजन, लष्कर जलकेंद्राचा पुनर्विकास करन्यासाठी तरतूद करण्यात आली असून वैकुंठ समशानभूमी पुनर्विकास ही नवी योजना आणण्यात आली आहे.सारसबाग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार, तसेच 32 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच बोटॅनिकल गार्डन उभारणार आहे. 

समाविष्ट गावांसाठी स्मार्ट व्हिलेज योजना प्रस्तावित गावांमधीक विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यात येणार आहे. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ही संस्था लोकसंख्या, सामाजिक, आर्थिक विश्लेषनाचा अभ्यास करून भविष्यकालीन आढावा घेतला जात आहेप्रायोगिक तत्वावर लोहगाव व मुंढवा ही गावे स्मार्ट व्हिलेज करणार. यासोबतच पर्यटन, मेट्रो, रस्ते, ग्रेड सेपरेटर, एचसीएमटीआर, उड्डाणपूल, खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रॅक, ट्राफिक पार्क, नाले सफाई, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अशा अनेक योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणेBudgetअर्थसंकल्प