पिंपरी : विविध प्रकारच्या सवलतीच्या दरातील पासपोटी सुमारे दोन कोटी ३७ लाख रुपये इतकी रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिका पुणे महानगर परिवहन महामंडळाला अदा करणार आहे. पीएमपीतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिक, विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे बसपास सवलतीच्या दरात देण्यात येतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना मासिक, त्रैमासिक पास, महापालिका सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांना मासिक पास, दैनंदिन पास हे ४० टक्के रकमेवर देण्यात येतात. त्याचप्रमाणे विविध अंध व्यक्ती, महापालिकेतील चालक, शिपाई, केंद्र व राज्य सरकारचे विशेष प्रावीण्य मिळालेल्या व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक आदींना मोफत पास देण्यात येतात. सन २०१५-१६ या वर्षासाठी या सर्व सवलतींच्या दरातील पासपोटी पीएमपीच्या सहव्यवस्थापकांनी २१ कोटी, ५० लाख, ११ हजार, २१४ रुपयांची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली होती. मात्र, तपासणीअंती ती रक्कम २० कोटी, ३७ लाख, ८० हजार, ८८७ रुपये इतकी झाली. त्यापैकी १८ कोटी इतकी रक्कम ५ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या ठरावानुसार अदा करण्यात आली आहे. उर्वरित २ कोटी, ३७ लाख, ८० हजार, ८८७ इतकी रक्कम पीएमपीला द्यावयाची आहे. ही रक्कम देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मंजुरी दिली.(प्रतिनिधी)
बसपाससाठी ‘पीएमपी’ला अडीच कोटी
By admin | Published: May 01, 2017 2:52 AM