शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

पीएमपीच्या चालकाला मारहाण

By admin | Published: April 27, 2017 5:03 AM

पीएमपी बसचालकाला बसमध्ये चढून मारहाण करण्यात आली. वाहनचालक किरण

पिंपरी : पीएमपी बसचालकाला बसमध्ये चढून मारहाण करण्यात आली. वाहनचालक किरण अभिमन्यू राऊत यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी मात्र केवळ अदखलपत्र गुन्हा नोंदवून घेतला आहे. आरोपीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.पीएमपीच्या बसवर किरण राऊत हे हंगामी स्वरूपात चालकाचे काम करतात. १५ एप्रिलला ते रात्री तळवडे येथे एम एच १४, सी डब्ल्यू १९४३ क्रमांकाची बस घेऊन जात होते. तेथे असलेल्या मोकळ्या जागेत ही बस उभी करण्यासाठी जात असताना, दोन जण बसला आडवे आले. त्यांनी हात दाखविल्याने चालकाने बस थांबवली. त्या वेळी आरोपी बसमध्ये चढला. बसमध्ये आल्यानंतर त्याने चालकाला शिवीगाळ केली. हातात असलेले फुटके भांडे चालक किरण याच्या डोक्यात मारले. जखमी करून आरोपी तेथून पसार झाला. रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. चालक किरण याने थेट पोलीस चौकी गाठली. डोक्यात मार लागलेल्या अवस्थेत पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. तेथून वायसीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. आरोपीने मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली असतानाही पोलिसांनी मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. चालकाच्या डोक्यात जे भांडे मारले होते, त्या भांड्यावर शारूख शेख असे लिहिले होते, त्याआधारे फिर्यादीने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र, एवढे सर्व काही करूनही पोलिसांनी पुढील कार्यवाही केली नाही. पोलिसांनी आरोपीला कठोर शासन करावे, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेणार असल्याचे किरण राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)