शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

पीएमपी करणार वीजनिर्मिती

By admin | Published: June 04, 2016 12:40 AM

तोट्याच्या गर्तेत असलेल्या पीएमपीचा अनुत्पादक खर्च कमी करून त्याद्वारे तोट्यावर मात करत प्रवाशांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून अभिनव उपक्रम हाती घेतले

पुणे : तोट्याच्या गर्तेत असलेल्या पीएमपीचा अनुत्पादक खर्च कमी करून त्याद्वारे तोट्यावर मात करत प्रवाशांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून अभिनव उपक्रम हाती घेतले जात आहेत. प्रवाशांना विनाथांबा बससेवा, प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड, मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आता पीएमपीकडून पारंपरिक ऊर्जेद्वारे वीजनिर्मितीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वारगेट डेपोच्या छतावर सौरऊर्जा आणि वायुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे प्रतिदिन ३५ केव्ही वीजेची निर्मिती केली जाणार आहे. ही सर्व वीज या डेपोच्या दैनंदिन कामकाजासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे या डेपोसाठी दरमहा येणारा तब्बल १ लाख रुपयांच्या विजेची बचत होणार आहे. अशा प्रकारे ऊर्जा निर्मितीचा वाहतूक संस्थेचा हा देशातील पहिला उपक्रम राहणार असून पीएमपीसाठी हा पथदर्शी ठरणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हा सर्व खर्च खासदार निधीतून अनिल शिरोळे यांनी उपलब्ध करून दिला आहे.असा आहे प्रकल्प पारपंरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून सौर आणि वायू ऊर्जेचा वापर करून हा प्रकल्प एकत्रित स्वरूपात उभारला जाणारा आहे. त्या अंतर्गत २० केव्ही उर्जा वाऱ्याद्वारे तर १५ केव्ही ऊर्जा सौर पॅनेलद्वारे निर्माण केली जाणार आहे. सध्या या डेपोमध्ये वीज महावितरणकडून घेतली जाते. त्यासाठी महिन्याला एक लाख रुपये खर्च येतो.