पुणे : बससेवा सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी प्रवाशांचा अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. लॉकडाऊनपुर्वी एका दिवसांत मिळणारे सुमारे दीड कोटी उत्पन्नासाठी अकरा दिवस लागले आहेत. तसेच सध्या मिळणारे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सध्या पीएमपीला प्रति किलोमीटर सुमारे ६० रुपये खर्च येत असून उत्पन्न केवळ १० ते १२ रुपये एवढे आहे. त्यामुळे पीएमपीला जेमतेम इंधन खर्च भागण्याइतपत उत्पन्न मिळत आहे.
कोरोना संकटामुळे २३ मार्चपासून पीएमपी बससेवा बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १०० ते १२५ बस मार्गावर धावत होत्या. लॉकडाऊनची बंधने शिथिल केल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. त्यामुळे पीएमपी सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार ३ सप्टेंबरपासून २५ टक्के बस मार्गावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे ४२५ बस मार्गावर धावत आहेत. पहिल्या दिवशी सुमारे ८१ हजार प्रवाशांनी बसने प्रवास केला. त्यातून ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दिवसेंदिवस प्रवाशांचा आकडा वाढत चालला आहे. दि. १० सप्टेंबर रोजी हा आकडा सव्वा लाखांच्या पुढे तर उत्पन्नही १८ लाखांच्या पुढे गेले आहे.
अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने पीएमपीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनपुर्वी पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न सुमारे दीड कोटी तर प्रवासी संख्या दहा लाखांच्या पुढे होती. तर दैनंदिन प्रति किलोमीटर खर्च ७० ते ८० रुपये आणि उत्पन्न सुमारे ५० रुपये मिळत होते. पण सध्या मिळणारे उत्पन्न १० ते १२ रुपयांपर्यंत खाली आले आहे. तर खर्च सुमारे ६० रुपये एवढे आहे. त्यामुळे खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसताना दिसत नाही.------------पीएमपीचे दैनंदिन प्रवासी व उत्पन्नदिवस प्रवासी उत्पन्न३ सप्टेंबर ८१,१६२ ११,१८,१३६४ सप्टेंबर ९८,३७५ १४,०२,८९०५ सप्टेंबर ९७,११३ १३,५५,३६०६ सप्टेंबर ८२,६२८ १०,९४,५९८७ सप्टेंबर १,२०,२७७ १७,५२,६४६८ सप्टेंबर १,२१,१७९ १७,४६,२५७९ सप्टेंबर १,२२,५९२ १७,२३,८३३१० सप्टेंबर १,२८,४६३ १८,३९,६२१११ सप्टेंबर १,२७,९५१ १८,०५,६९११२ सप्टेंबर १,२२,००९ १६,९०,०९४१३ सप्टेंबर १,०३,१६४। १३,८५,५६४---------------------------------------- शाळा, महाविद्यालये बंद- कोरोनाची भिती- अनेकांकडून खासगी वाहनांचा वापर- कार्यालयांमध्ये कमी उपस्थिती- दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा