पुणे : राज्य शासनाने बकोरिया यांच्याकडे पीएमपीचा पदभार सोपविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पीएमपीला खीळ बसण्याची भीती काहीशी दूर झाली आहे. कार्यक्षम अधिकारी म्हणून बकोरिया यांची ख्याती आहे. आयएएसच्या २००६ च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या बकोरिया यांची नियुक्ती वर्षभरापूर्वी पालिकेत झाली. तेव्हापासून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. पालिकेच्या काही मोठ्या ठेकेदारांना काळ््या यादीत टाकण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. जंगली महाराज रस्त्यावरील मेकॅनिकल पार्किंग सील करण्याची कारवाई त्यांनी नुकतीच केली. या पार्किंगचा वापर माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या नातेवाइकांची कंपनी असलेल्या साई सर्व्हिस स्टेशनकडूनच केला जात होता. यासह विविध धाडसी निर्णय त्यांनी घेतले. दोन महिन्यांपूर्वीच शासनाने त्यांची बदली क्रीडा आयुक्तपदी केली होती. मात्र, विविध सामाजिक संस्थांसह काही पक्षांनीही बकोरिया यांच्या बदलीला विरोध केला. त्यामुळे त्यांच्याकडे क्रीडा विभागाचा अतिरिक्त भार देण्यात आला. काही दिवसांनी त्यांच्यावर पूर्णवेळ पालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली. आता त्यांच्यावर पीएमपीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पीएमपीला गती मिळण्याची आशा
By admin | Published: April 07, 2015 5:43 AM