शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोट्यवधीच्या मदतीनंतरही पीएमपी तोट्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 1:40 AM

यंदाचा तोटा २६८ कोटी : स्थायी समितीला अहवाल सादर

पुणे : दोन महापालिका दर वर्षी करत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मदतीनंतरही पीएमपी यंदाही तोट्यातच आहे. हा तोटा थोडाथोडका नसून तब्बल २६८ कोटी रुपयांचा आहे. स्थायी समितीला सादर केलेल्या अहवालात पीएमपीनेच ही आकडेवारी दिली असून त्याचे लेखापरीक्षण महापालिकेने केले आहे. आता पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रत्येकी ६० व ४० टक्के याप्रमाणे ही तूट भरून काढणार आहेत.

पीएमपीला २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रतिकिलोमीटर ५१ रुपये ४४ पैसे उत्पन्न मिळाले. दर किलोमीटरचा वाहतूक खर्च ७६ रुपये ९८ पैसे झाला आहे. त्यामुळे प्रतिकिलोमीटर २५ रुपये ५४ पैसे तोटा झाला आहे. या पद्धतीने वर्षभराचा तोटा २६८ कोटी रुपयांचा आहे. मागील वर्षीपेक्षा तो ४० कोटी १४ लाख रुपयांनी कमी आहे. मात्र, एकुणात तोटाच आहे. पीेएमपीच्या स्थापनेपासून म्हणजे सन २००७ पासून आतापर्यंत ही प्रवासी सेवा एकदाही फायद्यात आलेली नाही. आकडेवारीच ते स्पष्टपणे दाखवत असते. दर वर्षी ही तूट वाढतच चालली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना सक्षम वाहतूकव्यवस्था उपलब्ध करून दोन्ही महापालिकांच्या परिवहन समित्यांचे विलीनीकरण करून डिसेंबर २००७मध्ये पीएमपीएल ही स्वतंत्र कंपनी सुरू करण्यात आली. त्यात दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी, बस, त्यांच्या आस्थापना एकाच छताखाली आणण्यात आल्या. मात्र, या कंपनीला कार्यक्षम आणि पूर्णवेळ अधिकारीच मिळत नाही. राज्यभर गाजलेल्या तुकाराम मुंढे यांनी व्यवस्थापकीय संचालकपदी आल्यानंतर पीएमपी फायद्यात आणून दाखविण्याचे आव्हान स्वीकारले होते. त्यादृष्टीने त्यांनी कामही सुरू केले; मात्र एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच त्यांनी बदली करण्यात आली. त्यामुळे कोणीही आले तरी पीएमचे चाक गाळात रुतलेलेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.प्रवासी सेवा महत्त्वाचीपहिल्याच वर्षी ९ कोटी रुपयांची तूट आली. सन २०११-१२ मध्ये ही तूट २२ कोटी ८७ लाख होती. १२-१३ मध्ये ६२ कोटी, १३-१४ मध्ये ९९ कोटी ४० लाख तर १४-१५ मध्ये ही तूट तब्बल १६७ कोटी ६८ लाखांवर पोहोचली. त्यामुळे २०१५-१६ मध्ये आश्चयार्चा धक्का देत तूट १६ कोटींनी घटून १५१ कोटींवर आली. तर, २०१६- १७ मध्ये तूट वाढून २१० कोटी ४४ लाख गेली होती. प्रवासी सेवा महत्त्वाची असल्याने दोन्ही महापालिका ही तूट दर वर्षी प्रत्येकी ६० टक्के व ४० टक्के याप्रमाणे भरून देत असतात. पीएमपी फायद्यात यावी असे नाही; पण किमान ती तोट्यात असू नये, असे बोलले जात असते.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल