पुणे : लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना बससेवेकडे पुणेकरांना आकर्षित करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अपयश आले आहे. ‘पीएमपी’ची स्थिती सुधारण्याची केवळ घोषणाबाजीच होत राहिल्याने प्रवासी संख्येत वाढ झालेली नाही. मात्र, अद्यापही सुमारे दहा लाख प्रवाशांचा पीएमपीच्या सेवेवर भरवसा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील काही वर्षांत पीएमपीची दुरवस्था होऊनही प्रवाशांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही स्थिती चांगल्या बससेवेची गरज दर्शविते.‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह लगतच्या भागातही बससेवा पुरविली जाते. मागील काही वर्षांपासून लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे. पुणे व पिंंपरी चिंचवड शहरांत शिक्षण व नोकरीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत मोठी झाली आहे. पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या तर पिंपरी चिंचवडची लोकसंख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. त्यातुलनेत ‘पीएमपी’कडील बस आणि प्रवासी संख्येत मात्र वाढ झालेली नाही. सध्या पीएमपीकडे भाडेतत्वावरील बसेससह सुमारे २ हजार बस आहेत. काही वर्षांपासून त्यामध्ये बदल झालेला नाही.
‘पीएमपी’वर भरवसा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 5:03 AM