सचिन वाघमारे - पुणो
वर्षानुवर्षे पडून असलेले टायर्स, एकाच ठिकाणी पडून राहिलेले बसचे स्पेअर पार्ट्स, अस्वच्छता, पाण्याची डबकी, स्वत:ची कँटिन कमी असल्यामुळे कर्मशाळेतच जेवण करायला बसणारे कर्मचारी आणि या सर्वावर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पीएमपीएलचे स्पेअर पार्ट भांडार आणि अन्य विभागांचे रूपांतर ‘कचरा डेपो’मध्ये झाले आहे. दरम्यान, पीएमपीएमएलच्या मध्यवर्ती भांडारातील दहा कर्मचा:यांना डेंग्यू झाला आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शहरात डेंग्यूने उच्छाद मांडला आहे. डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यावर महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांकडून जनजागृती करण्यात येत आहे. सोसायटय़ा आणि शासकीय कार्यालयांना डेंग्यूची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणा:यांना दंड ठोठावण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे.
मात्र, महापालिकेच्या मालकीच्याच संस्थेमध्ये याकडे दुर्लक्ष करण्यात येत असेल तर, त्याला कोण बोलणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचा:यांच्या जिवाशी खेळणा:या या दुर्लक्षपणाला रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी कर्मचा:यांकडून करण्यात येत आहे.
मागील आठवडय़ात ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत पीएमपीएमएलच्या कर्मचा:यांनी स्वच्छतेची शपथ घेतली होती. मात्र, ही शपथ घेत असताना वर्कशॉपच्या परिसरात ऑईलचे पिंपही खुलेआम पडून आहेत.
भांडार विभागातील कचरा काढल्यास रोज रस्त्यावर उभ्या राहणा:या पीएमपीएमलला हक्काची जागा मिळू शकते. तसेच, भंगार माल विक्रीला काढल्यास त्यातून येणा:या उत्पन्नातून कर्मचा:यांचे थकलेले 18 कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात. मात्र, ही प्रक्रि याच राबविण्यात येत नाही.
उपनगरांतील बस डेपोतही टायर्स
शहरासह उपनगरांतील विविध डेपो, मुख्य बसस्थानके, कामगार वसाहती, तुटलेली बांधकामे या ठिकाणीही टायर्स पडून आहेत. ती लवकर हटवावीत, असे आवाहन पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनीकरूनही हा कचरा हटविण्यात आलेला नाही. अशा ठिकाणी प्रशासनाने त्वरित कारवाई करून ही सूचना अमलात आणण्याची गरज आहे.
‘डबल डेकर’चे स्पेअर पार्ट
स्वारगेटजवळील कर्मशाळेच्या भांडार विभागात पाणी साठले आहे. त्यामुळे त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे पाणी पंप लावून रोज काढले जाते, असा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, गेल्या अनेक दिवसांपासून येथील पाण्याची दरुगधी सुटली आहे. या ठिकाणीच अनेक दिवसांपासूनचे स्कॅ्र प टायर्स पडून आहेत. हे स्कॅ्र पपुण्यामध्ये ‘डबल डेकर’बस सुरू होती, तेव्हापासून (2क्क्7) तसेच पडून आहेत. पीएमपीएमएलचे विलीनीकरण होण्यापूर्वी हा स्क्रॅ प दर वर्षी भंगारामध्ये काढला जात असे. मात्र, याची जबाबदारी असणा:या मुख्य अभियंत्यांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षापासून हा कचरा उचलेला गेलेला नाही.
कर्मचा:यांच्या
जिवाशी खेळ नको
महापालिका प्रशासन आणि पीएमपीएलकडून अशा प्रकारे कर्मचा:यांच्या जिवाशी खेळ होत असून, दहा कर्मचारी डेंग्यूचे उपचार घेत आहेत. ते रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रशासने कराव्यात, असे पत्र पीएमपी कामगार संघ (इंटक) कर्मचारी संघटनेने दिले आहे. प्रभारी अध्यक्ष अशोक जगताप, विकास देशमुख, उपाध्यक्ष प्रमोद शेलार, सरचिटणीस नुरूद्दीन इनामदार उपस्थित होते.