शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

‘पीएमपी’ची नफ्याकडे धाव...

By admin | Published: August 09, 2016 2:04 AM

कंपनी स्थापनेपासून तोट्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रा. लि.ची (पीएमपीएमएल) धाव नफ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. कंपनीचा २0१५-१६च्या संचलन तुटीचे

पुणे : कंपनी स्थापनेपासून तोट्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रा. लि.ची (पीएमपीएमएल) धाव नफ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. कंपनीचा २0१५-१६च्या संचलन तुटीचे लेखापरीक्षण अहवाल तयार झाला असून, या आर्थिक वर्षासाठी पीएमपीला १५१ कोटी ८0 लाख रुपयांची तूट आली आहे. एका बाजूला पीएमपी प्रवाशांची घटत असलेली संख्या, मार्गावर असलेल्या अपुऱ्या बस तसेच तिकिटांच्या वाढत्या दरामुळे प्रवाशांचा ओढा खासगी वाहनांकडे असतानाही, ही घटलेली तूट कंपनीच्या ढासळलेल्या कारभारास दिलासा देणारी आहे. २0१५-१६ या आर्थिक वर्षात कंपनीला ७७६ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेले असून, ९२८ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे या लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)1पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना सक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दोन्ही महापालिकांच्या परिवहन समित्यांचे विलीनीकरण करून डिसेंबर २00७ मध्ये पीएमपीएमएल ही स्वतंत्र कंपनी सुरू करण्यात आली. त्यात दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी, बस, त्यांच्या आस्थापना एकाच छताखाली आणण्यात आल्या. मात्र, या कंपनीस कार्यक्षम आणि पूर्णवेळ अधिकारीच मिळत नसल्याने स्थापनेच्या दुसऱ्या वर्षापासूनच या कंपनीचा तोट्याकडे प्रवास सुरू झाला.2पहिल्या वर्षी ९ कोटी संचलन तुटीपासून हे तुटीचे ग्रहण पीएमपीला लागले. २0११-१२ मध्ये ही तूट २२ कोटी ८७ लाख होती, १२-१३ मध्ये ६२ कोटी, १३-१४ मध्ये ९९ कोटी ४0 लाख तर १४-१५ मध्ये ही तूट तब्बल १६७ कोटी ६८ लाखांवर पोहोचली. त्यामुळे २0१५-१६ मध्ये पीएमपीच्या बसेस, घटती प्रवासीसंख्या लक्षात घेता हा आकडा २00 कोटींच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत ही तूट १६ कोटींनी घटून १५१ कोटींवर आली आहे.पीएमपीला २0१५-१६ या आर्थिक वर्षात वाहतूक संचलनातून घवघवीत उत्पन्न मिळाले आहे. अहवालानुसार, २0१४-१५ मध्ये संचलनातून ५५0 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. हे उत्पन्न २0१५-१६ मध्ये तब्बल ६0९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजे संचलन उत्पन्नात तब्बल ५९ कोटी रुपयांची वार्षिक वाढ मिळालेली आहे. मात्र, एका बाजूला गेल्या वर्षभरात प्रवासी संख्या तब्बल १ ते दीड लाखांनी घटलेली आहे. त्यामुळे हे उत्पन्न वाढीव तिकीटदरातून मिळाले असल्याचे बोलले जात आहे. त्यातच मार्गावरील बसची संख्याही घटत असल्याने जादा बस असत्या तर उत्पन्नात आणखी वाढ झाली असती, असा मतप्रवाह आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार, पीएमपीची तूट दोन्ही महापालिकांनी देणे आवश्यक आहे. त्यानुसार, १५१.८0 लाख रुपयांच्या तुटीत पुणे महापालिकेस ६0 टक्के म्हणजेच ९१ कोटी ८ लाख रुपये, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेस ४0 टक्के म्हणजेच ६0.७२ टक्के रक्कम मोजावी लागणार आहे. दरम्यान, या दोन्ही महापालिकांनी ही तुटीची रक्कम १५0 कोटी रुपये गृहीत धरून त्यानुसार, मार्च २0१६ पासून समान हप्त्यांमध्ये ही रक्कम देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.