शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

पीएमपीच्या ताफ्याला मिळणार नवी झळाळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:47 PM

पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नवीन सीएनजी बसही येणार असल्याने ‘पीएमपी’ला नवी झळाळी मिळणार आहे.

ठळक मुद्दे‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या सुमारे २ हजार बस भाडेतत्वावरील सर्व व पीएमपीच्या मालकीच्या सुमारे ६०० बस सीएनजीवर धावतातमे महिन्याच्या मध्यापासून १२ मीटर लांबीच्या ई-बस ताफ्यात येण्यास सुरूवात होणार पुढील तीन महिन्यात १२५ बसतेजस्विनी बस, २५ इलेक्ट्रिक बस आणि पुढील चार-पाच महिन्यात एक हजार बस मिळणार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यात लवकरच १२ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. पुढील महिन्याच्या मध्यापासून या बस ताफ्यात येण्यास सुरूवात होणार असून या बस बीआरटी मार्गातून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नवीन सीएनजी बसही येणार असल्याने ‘पीएमपी’ला नवी झळाळी मिळणार आहे.‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या सुमारे २ हजार बस आहेत. त्यापैकी ६५३ बस भाडेतत्वावरील असून उर्वरीत बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. भाडेतत्वावरील सर्व व पीएमपीच्या मालकीच्या सुमारे ६०० बस सीएनजीवर धावतात. तर उर्वरीत बसपैकी २५ बस इलेक्ट्रिक व इतर बस डिझेलवरील आहेत. मालकीच्या काही बस १६ वर्ष वयोमान असलेल्या आहेत. निम्म्याहून अधिक  बस ८ ते १० वर्षाच्या पुढील आहेत. या बसची धाव निश्चित क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झालेले नाही. दररोज सरासरी १५० बस मार्गावरच बंद पडतात. तर देखभाल-दुरूस्तीअभावीही त्यापेक्षा जास्त बस आगाराच्या बाहेरच पडत नाहीत. त्यामुळे दररोज ४ ते ५ हजार फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे पीएमपीला नवीन बसची प्रतिक्षा आहे.ही प्रतिक्षा पुढील महिन्यापासून संपणार आहे. मे महिन्याच्या मध्यापासून १२ मीटर लांबीच्या ई-बस ताफ्यात येण्यास सुरूवात होणार आहे. पुढील तीन महिन्यात १२५ बस मिळतील. त्याचप्रमाणे बारा मीटर लांबीच्या ४०० सीएनजी बसची खरेदी प्रक्रियाही अंतिम झाली आहे. या बस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून येतील. तसेच ४४० सीएनजी बसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांत या बस मिळतील. त्यामुळे पुढील ऑगस्ट ते सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत सुमारे एक हजार नवीन बस ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.------डिझेल दर प्रति लिटर - ६८ रुपयेप्रति किलोमीटर खर्च - २२-२३ रुपयेसीएनजी दर प्रति किलो - ५५.३०प्रति किलोमीटर खर्च - १९ई-बस दर प्रति युनिट - ८ रुपयेप्रति किलोमीटर खर्च - ८ रुपये............नऊ मीटर लांबीच्या ईलेक्ट्रिक बसमध्ये चार बॅटरी आहेत. या सर्व बॅटरी चार्जिंग करण्यासाठी एकच पॉईंट असून सुमारे तीन तासात संपुर्ण चार्जिंग होते. यामध्ये ही बस २२५ किलोमीटर धावू शकते. पण सध्या १८० किलोमीटर धावल्यानंतर बॅटरी पुन्हा काही काळ चार्जिंग केली जाते. त्यासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चार्जिंग अभावी बस बंद पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या बॅटरीचे वयोमान साधारणपणे १० वर्ष असून सुमारे ४ हजार वेळा पुर्ण चार्जिंग होतात. या बसमुळे शुन्य टक्के प्रदुषण होते. नऊ मीटर लांबीच्या बसला केवळ डाव्या बाजूलाच दरवाजा आहे. तर बारा मीटर लांबीच्या बसला दोन्ही बाजूला दरवाजे आहेत. त्यामुळे या बसची आसन संख्या जवळपास सारखीच आहे. -----------मागील काही वर्षात ‘पीएमपी’ला नवीन बस मिळाल्या नाहीत. मात्र, पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षीपासून या बस येण्यास सुरूवात झाली आहे. मागील वर्षी २०० मिडी बस मिळाल्या. त्यानंतर तेजस्विनी बस, २५ इलेक्ट्रिक बस आणि पुढील चार-पाच महिन्यात एक हजार बस मिळणार आहेत. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होणार असून प्रवाशांनाही चांगली सुविधा मिळणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNayana Gundeनयना गुंडे