शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

‘ब्रोकन पॅटर्न’मुळे पीएमपीची बचत

By admin | Published: May 06, 2015 5:56 AM

प्रवाशांविना रिकाम्या धावणाऱ्या बस कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत ‘ब्रोकन शेड्युल’ हा नवीन पॅटर्न राबविला जात आहे.

राजानंद मोरे, पुणेप्रवाशांविना रिकाम्या धावणाऱ्या बस कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत ‘ब्रोकन शेड्युल’ हा नवीन पॅटर्न राबविला जात आहे. या पॅटर्नमुळे दरमहा ‘पीएमपी’ची लाखो रुपयांची बचत होऊ लागली आहे. तसेच बसच्या देखभाल-दुरूस्तीलाही वेळ मिळत असल्याने गर्दीच्या वेळी मार्गावर बस बंद पडण्याचे प्रकारही कमी होत आहेत. ‘पीएमपी’त पहिल्यांदाच पॅटर्न राबविला जात आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात ‘पीएमपी’च्या बस पहाटे ५ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ११ वाजेपर्यंत अशा दोन पाळ््यांमध्ये धावत असतात. जानेवारी महिन्यापर्यंत या वेळेत ब्रेकडाऊन वगळता मार्गावरील बसचे प्रमाण जवळपास सारखेच होते. शहरात साधारणत: सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत बसला गर्दी असते. इतर वेळेत बस रिकाम्याच धावत होत्या. गर्दी असो वा नसो बस धावतच असायच्या. त्यामुळे पीएमपीला मोठा तोटा सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून पीएमपीने फेब्रुवारी महिन्यापासून ‘ब्रोकन शेड्युल’ ही संकल्पना राबविण्यास प्रारंभ केला आहे. तीन महिन्यांत पॅटर्नमुळे पीएमपीची इंधन तसेच मनुष्यबळाच्या रूपाने लाखो रुपयांची बचत झाली आहे. या पॅटर्नविषयी अधिक माहिती देताना पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले, की राज्यात केवळ मुंबईतील बेस्टमध्ये हा पॅटर्न राबविला जातो. मागणी-पुरवठा या मूलभूत अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार गर्दीच्यावेळी जादा बस व गर्दी संपल्यानंतर कमी बसचे संचलन आवश्यक असते. त्यानुसार ब्रोकनमध्ये केवळ गर्दीच्या वेळीच अधिक बस सोडल्या जातात. ज्या वेळेत प्रवासी संख्या कमी असते, त्या वेळेत बसची संख्याही कमी केली जाते. त्यामुळे डिझेलची बचत होऊ लागली आहे. सध्या सुमारे १८० बस गर्दी नसलेल्या वेळेत मार्गावरून हटविल्या जातात. या वेळेत बसच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. तसेच वाहक-चालकांनाही विश्रांती मिळत आहे. दरम्यान, या पॅटर्नमुळे पीएमपीची इंधन तसेच मनुष्यबळाच्या रूपाने पीएमपीच्या खर्चामध्ये बचत झाली आहे. (प्रतिनिधी)पीएमपीची इंधन बचत४ब्रोकन पॅटर्नपूर्वी म्हणजे जानेवारी महिन्यात सरासरी ९०९ बससाठी सुमारे ११ लाख ३९ हजार लिटर डिझेलचा वापर झाला. तर, ब्रोकन सुरू केल्यानंतर फेब्रुवारी व मार्च महिन्यात बस वाढूनही डिझेल वापर कमी झाल्याचे दिसते. हेच सीएनजी वापराचेही चित्र आहे.महिनासरासरीडिझेल वापरसीएनजी वापर मार्गावरील बस(लिटरमध्ये)(कि.ग्रॅ.मध्ये)डिसेंबर७६४८,७५,९४८४,१०,८२१जानेवारी९०९११,३९,१८६५,५४,७७०फेब्रुवारी९३४१०,७६,०८४५,११,४२५मार्च९३१११,१६,०४५५,३७,९६०पीएमपीचा ब्रोकन पॅटर्न४पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत बसला फारशी गर्दी नसते. या वेळेत सुमारे १३०० बस मार्गावर आणल्या जातात. त्यानंतर सकाळी ८ ते १२ या गर्दीच्या वेळेत सुमारे २०० बस वाढविल्या जातात. पुन्हा १२ ते ४ या वेळेत या २०० बस कमी करून दुपारी ४ ते ८ या गर्दीच्यावेळी वाढविण्यात येतात. रात्री आठनंतर हळूहळू गर्दी ओसरत जाते, तशी बसची संख्याही कमी केली जाते.