शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

पीएमपीच्या प्रवाशाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:16 AM

बस थांब्यावर गाडी का थांबवली नाही, असा जाब विचारणाºया प्रवाशाला चालक आणि वाहकाने मारहाण केल्याचा करण्याचा धक्कादायक प्रकार पुणे स्टेशन येथील बसस्थानकावर घडला.

पुणे : बस थांब्यावर गाडी का थांबवली नाही, असा जाब विचारणाºया प्रवाशाला चालक आणि वाहकाने मारहाण केल्याचा करण्याचा धक्कादायक प्रकार पुणे स्टेशन येथील बसस्थानकावर घडला. याप्रकरणी संबंधीत प्रवाशाने चालकाविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असून, या घटनेबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतानाही या दोघांना डेपो मॅनेजर पुणे स्टेशन आगाराकडून त्यांना आज दिवसभर कोणतीही ड्युटी लावण्यात आलेल्या नाही, एवढीच काय ती कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यासंदर्भात रिपोर्टिंग झाले आहे, संबंधित अधिकाºयांकडून कारवाई केली जाईल, असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.इर्शाद पिरजादे (वय ६६, रा. दापोडी) हे पुणे स्टेशन परिसरातील नवीन जिल्हाधिकारी इमारती जवळील बसथांब्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास दापोडीला जाण्यासाठी थांबले होते. त्याच दरम्यान चिंचवडगावला जाणारी बस आली परंतु ती थांब्यावर न थांबताच पुढे गेली. जवळच गतिरोधक असल्याने चालकाने वेग कमी केल्याने पिरजादे यांनी पळत जाऊन बस थांबवली. पिरजादे यांनी चालकाला बस थांबवली का नाही? असा जाब विचारला असता चालकाने खाली उतरून पिरजादे यांना अरेरावी करण्यास सुरुवात केली. तेव्हा पिरजादे यांनी याची तक्रार पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याकडे करणार असल्याचे सांगताच चालकाने ‘काय करायचे ते तर कर, माझी मंत्री दिलीप कांबळे यांच्याशी ओळख आहे’ असे सांगत चालकाने पिरजादे यांना दम दिला.त्यानंतर पुणे स्टेशन येथील बस थांब्यावर गाडी थांबली असता खाली उतरलेल्या पिरजादे यांची चालकाने गचांडी धरली आणि त्यांना मारहाण केली. तेथील नागरिकांनी मध्यस्थी करत दोघांनाही बाजुला केले.त्यानंतर पिरजादे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात चालक आणि वाहकाच्या विरोधात तक्रार दिली असून याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बेशिस्त कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारणारे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तुकाराम मुंढे दोघांवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.