पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर पीएमपी बसच्या सरासरी प्रवासीसंख्येने या आर्थिक वर्षातील 6 महिन्यांत नीचांकी आकडा गाठल्याचे समोर आले आहे. 2क्12र्पयत पीएमपीची प्रतिदिन प्रतिबस सरासरी प्रवासीसंख्या सुमारे 9क्क् पेक्षा जास्त राहिलेली आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात ही सरासरी 748 र्पयत खाली आली होती. तर, सप्टेंबर महिन्यात हा आकडा 843 एवढा होता.
पुणो म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (पीएमपी) व पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (पीसीएमटी) या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणातून 2क्क्7मध्ये पुणो महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ही कंपनी स्थापन करण्यात आली. त्यानंतर सुरुवातीची 3-4 वर्षे पीएमपीची बससेवा ब:यापैकी सुरू होती. मात्र, कालांतराने पीएमपीला उतरती कळा लागली. कर्जाचा बोजा वाढत गेला; त्यामुळे प्रवाशांना योग्य सुविधा पुरविणो अशक्य होऊ लागले. परिणामी, प्रवाशांच्या संख्येत मोठी घट होत गेली. पीएमपीला कर्मचा:यांचे वेतन देणोही कठीण होऊन बसले आहे.
4पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षात पीएमपीच्या प्रवासीसंख्येत मोठी घट होऊ लागली आहे. नियमित बस नसणो, बसची दुरवस्था अशा कारणांमुळे प्रवासी या सेवेपासून दूर जाऊ लागले आहेत. 2क्क्8मध्ये काही महिने पीएमपीची प्रतिदिन प्रतिबस प्रवासीसंख्या सरासरी 1,क्क्क् एवढी होती.
4पुढे त्यामध्ये काही प्रमाणात सातत्य राहिले. 2क्12-13 र्पयत ही सरासरी कमी होत गेली. एप्रिल 2क्14 या महिन्यात त्यात कमालीची घट झाली. ही सरासरी केवळ 748 एवढी होती. सप्टेंबर्पयत त्यात सुमारे 1क्क् प्रवाशांची भर पडली. मात्र, सध्या पीएमपीची स्थिती पाहता, प्रवाशांची सरासरी 9क्क् पेक्षा जास्त होणार नाही. ही स्थिती सुधारण्यासाठी प्रतिदिन प्रतिबस 95क् ते 1,क्क्क् प्रवाशांचे उद्दिष्ट देण्याची गरज आहे. त्यानुसार आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी.