राजानंद मोरे- पुणे : बसला आग लागण्याचे प्रकार, ब्रेकडाऊन, अपघात थांबविण्यात अपयश येत असल्याचे कारण जुन्या बस असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात या बसची देखभाल-दुरूस्ती करणारा विभागच खिळखिळा झाल्याचे समोर आले आहे. पीएमपी चे एकुण १३ आगारातील वर्कशॉप आणि मध्यवर्ती वर्कशॉपमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल निम्मी म्हणजे ११०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे देखभाल-दुरूस्तीच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीएमपीच्या मालकीच्या बसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम संबंधित आगारातील वर्कशॉपमध्ये केले जाते. तर इंजिनसह अन्य मोठी कामे स्वारगेट येथील मध्यवर्ती वकॅशॉपमध्ये केली जातात. सध्या पीएमपीकडे मालकीच्या सुमारे १४७५ बस आहेत. त्यापैकी सुमारे ४०० बस विविध कारणांमुळे मार्गावर येत नाहीत. पीएमपीची २००७ मध्ये निर्मिती झाल्यानंतर वर्कशॉपसाठी सुमारे २२६६ पदे मंजुर करण्यात आली होती. तेव्हापासूनच रिक्त पदांची संख्या लक्षणीय राहिली आहे. निवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, बडतर्फ अशा विविध कारणांनी मागील १२ वर्षात ही संख्या निम्म्यापर्यंत खाली आली आहे. पदोन्नती तसेच भरती नसल्याने अनेक वरिष्ठ पदे रिक्त राहिली आहेत. पीएमपी तील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रस्ते परिवहन संस्थेने (सीआयआरटी) निश्चित करून दिलेल्या निकषानुसार प्रत्येक बस मागे १.४ इतके कर्मचारी असणे अपेक्षित आहे. सध्या वर्कशॉपमध्ये केवळ ११५० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ९७५ कर्मचारी विविध आगारांमध्ये तर उर्वरीत १५० मध्यवर्ती कार्यशाळेत आणि २५ कर्मचारी वायरलेसमध्ये आहेत. त्यातही वर्कशॉपमधील काम तीन शिफ्टमध्ये चालते. तसेच कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांही ग्राह्य धरल्यास पाच बसमागे तीन कर्मचारी अशी स्थिती आहे. दरम्यान, पीएमपीचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पुर्ण झाल्यानंतर पदोन्नती व पदभरतीबाबत निर्णय होऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. --------------पीएमपी ताफ्यातील बस - १४७५वर्कशॉपमधील मंजुर पदे - २२५०सध्या कार्यरत कर्मचारी - ११५०रिक्त पदे - ११००सीआयआरटीचा निकष - प्रति बस १.४ कर्मचारीसध्यस्थिती - प्रति बस ०.७ कर्मचारी---------
पीएमपीचे वर्कशॉपच खिळखिळे : अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल ११०० पदे रिक्त
By पंढरीनाथ कुंभार | Published: August 30, 2019 7:00 AM
पीएमपी चे एकुण १३ आगारातील वर्कशॉप आणि मध्यवर्ती वर्कशॉपमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल निम्मी म्हणजे ११०० पदे रिक्त आहेत.
ठळक मुद्देनिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, बडतर्फ अशा कारणांनी मागील १२ वर्षात ही संख्या निम्म्यापर्यंत खाली