बाळासाहेब जगताप, नितीन दोरगे, दिलीप हंडाळ, विठ्ठल दोरगे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य दत्तात्रय भरणे म्हणाले की, पीएमपीएल बससेवा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना फायदा होणार आहे. या पीएमपीएलमुळे ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणार आहे. माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, वरवंड गावाने सहा महिने पीएमपीसाठी प्रयत्न केले. गावाने या कामासाठी एकत्रित प्रयत्न करून हा यशस्वी प्रयत्न केला आहे.
राजेंद्र जगताप या सांगितले की, पीएमआरडी हद्द ज्या ठिकाणपर्यंत आहे त्या ठिकाणी बस नेण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात 12 मार्ग चालू केले आहेत, त्याना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पीएमपीएल उद्घाटन करताना मान्यवर.