वरवंड : पीएमपीएल बसची सेवा वरवंडपर्यंत सुरू करण्याच्या मागणीला यश आले आहे. ‘लोकमत’मध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला वरवंडकरांच्या मागणीला यश आले आहे. पीएमपीएल अधिकारी यांनी वरवंडला येऊन जागेची पहाणी केली. त्या अनुषंगाने वरवंडमध्ये (दि. २०) पासून बससेवा चालू करण्यात येणार आहे.
पीएमपीएल बससेवा ही यवतपर्यंत आहे. ही बससेवा वरवंडपर्यंत करण्याची मागणी विद्यार्थी वर्गातून केली जात होती. वरवंड येथे शिक्षणासाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असून, गावामध्ये सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महानंदा दूध बुकटी प्रकल्प, पुणे जिल्हा दूध संघ, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या शासकीय कार्यालय असून यासाठी विद्यार्थी, सरकारी नोकरदार वर्ग, मोठ्या प्रमाणात गाडीने प्रवास करीत असून यांना प्रवास करताना अडचणी येत आहे. यवत ते वरवंड अवघ्या पंधरा किलोमीटर अंतर असून ही बससेवा शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी वरवंडपर्यंत होणे गरजेचे आहे. वरवंडमध्ये शिक्षणासाठी व नोकरीनिमिताने पुणे, हडपसर, लोणी काळभोर, यवत, भांडगाव, चौफुला, पडवी, सुपा, देऊळगाव गाडा, केडगाव, पारगाव या गावांतून ये-जा करत आहेत. यामुळे बससेवेला मोठा फायदा होणार आहे.
सध्या कोरोनामुळे शाळांना सुटी असली तरीही शाळा व विद्यालय सुरू होणार आहे. पीएमपीएल अधिकारी वर्गाने जागेची पहाणी करून हिरवा कंदील दिला आहे. या वेळी शिवाजी चोरगे, दत्ता बडदे, उपसरपंच प्रदीप दिवेकर, राहुल दिवेकर, भीमराव कोळी, अप्पा पंडित व ग्रामस्थ उपस्थित होते. या मागणीसाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत वरवंड, श्री गोपीनाथ महाराज व्यापारी संघटना, वरवंड ग्रामशिक्षण संस्था, श्री नागनाथ विद्यालय वरवंड व ग्रामपंचायत ठराव करण्यात आला होता.
पीएमपीएल अधिकारी पाहणी करताना.